कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची उद्या महत्त्वपूर्ण आढावा बैठक

कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची उद्या महत्त्वपूर्ण आढावा बैठक

कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीची उद्या महत्त्वपूर्ण आढावा बैठक

मसाई पठार लेणी संवर्धन आणि अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या मुद्द्यावर होणार महत्त्वपूर्ण मंथन

कोल्हापूर: विशेष प्रतिनिधी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांचा जागर करण्यासाठी आणि सामाजिक चळवळीला नवी दिशा देण्यासाठी ‘आंबेडकरी समाज संघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती’च्या वतीने उद्या, शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी एका भव्य आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कान्फरन्स हॉलमध्ये दुपारी ३ वाजता ही बैठक संपन्न होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली.

​येत्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक कार्यक्रमांची ठोस आखणी करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असून, यामध्ये चार प्रमुख विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे.

बैठकीचे मुख्य विषय व अजेंडा:

  • बुद्ध जयंती व लेणी संवर्धन: दि. १ मे २०२६ रोजी साजरी होणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंती सोहळ्याचे नियोजन करणे. तसेच, मसाई पठारावरील सम्राट अशोक कालीन प्राचीन बौद्ध लेण्यांच्या संवर्धनासाठी आणि तेथे पुरातत्व विभागामार्फत संशोधन सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे.
  • लोकराजा शाहू महाराज जयंती: २६ जून रोजी येणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक आणि लोकाभिमुख उपक्रमांची रूपरेषा निश्चित करणे.
  • अनुसूचित जाती वर्गीकरण (अ, ब, क, ड): सध्या राज्यात चर्चेत असलेल्या अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाच्या संवेदनशील मुद्द्यावर समाजाची भूमिका आणि पुढील संघर्षाची दिशा ठरवण्यासाठी हे मंथन निर्णायक ठरणार आहे.
  • वार्षिक उपक्रम (२०२६-२७): आगामी वर्षभरासाठी विविध लोकोपयोगी आणि समाजहिताच्या कार्यक्रमांचे नियोजन करणे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *