इचलकरंजी:
दि. ११ नोव्हेंबर – अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत शहापूर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ₹७,२९०/- इतक्या किमतीचा गांजा आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २०/११/२०२५ रोजी सायंकाळी ७:३० ते ८:५५ च्या सुमारास, ताराराणी टॉवर जवळील तुळजाभवानी अपार्टमेंटजवळ, शहापुर, ही कारवाई करण्यात आली.
गुन्हा दाखल:
- पोलिस ठाणे: शहापुर, इचलकरंजी
- गुन्हा नं. आणि कलम: ३४६/२०२५, कलम ४/क/२० अंमली पदार्थ अधिनियम १९८५.
- फिर्यादी: रोहित राजेंद्र डावाळे, पोकों ९३३३, नेमणूक शाहूपुरी पोलीस ठाणे.
- आरोपीचे नाव: सौ. लक्ष्मी आयप्पा गुरव, वय ६० वर्षे, रा. जी के नगर, तारदाळ
- गुन्हा दाखल वेळ: दि. २०/११/२०२५ रोजी ००:३३ वाजता (फिर्यादीच्या माहितीनुसार रात्री ८:५५ च्या सुमारास)
जप्त केलेला माल: - पोलिसांनी आरोपीकडून एकूण ₹७,२९०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २०३ ग्रॅम वजनाचा हिरवट पाने, फुले, काड्या आणि बिया यांचा संगम असलेला, सुगंधी, सुतदरा गाठी बांधलेला गांजा (अंमली पदार्थ), आणि प्लास्टिक पिशवीसह जप्त करण्यात आला आहे.
- गुन्ह्यात वापरलेली रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांची कार्यवाही:शहापुर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी सौ. लक्ष्मी आयप्पा गुरव यांना रंगेहाथ पकडले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला माल आणि आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोना १२६९ कोळी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

