मंथन स्पर्धा परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर – विराट काळेलचे घवघवीत यश ; वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी

मंथन स्पर्धा परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर – विराट काळेलचे घवघवीत यश ; वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी

मंथन स्पर्धा परीक्षा २०२६ चा निकाल जाहीर – विराट काळेलचे घवघवीत यश

वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी

कोल्हापूर दि. १५ (प्रतिनिधी) मंथन स्पर्धा परीक्षा २०२६ या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये मध्ये वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी विराट कावेरी सचिन काळेल यांने राज्यांमध्ये इंग्लिश मीडियम माध्यमातून महाराष्ट्र राज्यात १५० पैकी ११८ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात १७ व्या रँक मिळविला आहे.

यापूर्वीही घेण्यात आलेल्या बीडीएस (ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप) परीक्षा २०२६ मध्ये त्याने १०० पैकी ८४ गुण मिळवून सिल्वर मेडल व देशमुख टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये मध्ये २०० पैकी १८८ गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. त्याच्या यशामध्ये वसंतराव जयवंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रूपाली पास्ते, वर्गशिक्षिका प्रज्ञा नाईक तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षिकेत्तर सर्व स्टाफ व संस्थेचे संस्थापक शारंगधर देशमुख यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. तसेच विराट काळेल याचे आई- वडिल कावेरी सचिन काळेल यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *