दानवाडमधील ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ आंदोलन स्थगित
नवे दानवाड :
इचलकरंजी महानगरपालिकाकेची जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणी योजना आणि दानवाड पंचक्रोशीतील पाणीपुरवठा, सिंचन व विकासात्मक मागण्यांसाठी राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती, पँथर आर्मी, स्वराज्य क्रांती सेना आणि ग्रामस्थांच्या वतीने पुकारण्यात आलेले ‘राधाकृष्ण जल सत्याग्रह’ बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या अति आयुक्तांच्या पत्रकानुसार, मागण्यांबाबत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेचा व आश्वासनाचा सन्मान करत, पँथर आर्मी प्रमुख संतोषदादा आठवले व पदाधिकाऱ्यांनी २२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू असलेले हे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. तसेच अधिकृत सुत्रांच्या माहिती नुसार राधाकृष्ण पाणी प्रश्नावर इचलकरंजी महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी , सांगली व कोल्हापुर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता व दानवाड ग्रामस्थाची व्यापक बैठक दिपावली नंतर नवे दानवाड मारुती मंदीर समोर आयोजीत करून सर्वमान्य तोडगा काढण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात येणार आहे .
यावेळी सुकुमार पाटील, खंडेराव चव्हाण, सज्जनसिंग रजपूत, भरमगोंडा पाटील, भगतसिंग शिलेदार, बाबासो कुन्नरे, दादासो पिरकाने, बापुसो कुंभोजे, सुरेश पिरकाने, राजू बेरड, शिवाजी साळुंखे, शिवगोंडा पाटील दिनेश कांबळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
