रिता इंडिया फाऊंडेशन, पुणे आणि ग्लोबल एज्युकेटर्स फोरम, दिल्ली यांच्या वतीने “अर्थसंकल्प 2025-2026 अंतरंग आणि विश्लेषण ” कार्यशाळा संपन्न
रिता इंडिया फाऊंडेशन, पुणे आणि ग्लोबल एज्युकेटर्स फोरम, दिल्ली यांच्या वतीने वसंत पंचमी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत अहमदनगर आणि पुण्यातील सुखसागरनगर मधील अनामप्रेम संस्थेतील अंध आणि दिव्यांग बांधव यांच्यासाठी “अर्थसंकल्प 2025-2026 अंतरंग आणि विश्लेषण ” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. हि कार्यशाळा रिता इंडिया फाऊडेशनच्या संस्थापिका आणि अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. रिता मदनलाल शेटीया यांनी घेतली. या कार्यशाळेचे स्वरूप ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही स्वरूपाचे होते.
या कार्यशाळेचा उद्देश आपल्यातील दिव्यांग बंधू भगिनी यांना देखील भारताचा अर्थसंकल्प समजणे, त्यातील रुपया येतो कसा, भविष्यातील विविध योजनांद्वारे कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राला पुढे नेण्यासाठी कोणती योजना/धोरणे स्वीकारली आहेत त्याची अंमलबजावणी कशी होते, अर्थसंकल्पात कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात हे विकसित भारताच्या प्रवासातील इंजिन म्हणून भर देण्यात आला आहे, ज्यात समावेशकतेच्या भावनेने करण्यात येणाऱ्या सुधारणांचा इंधन म्हणून वापर केला जातो. या अनुषंगाने अर्थसंकल्पमध्ये अधिक तरतुदी आवश्यक आहेत. तसेच अर्थसंकल्पमध्ये कौशल्य विकास यावर भर दिला असून, याचा तरुणांना नक्कीच फायदा होणार आहे. एकूण जीडीपीच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. ग्रामीण महिला, तरुण शेतकरी, ग्रामीण युवा, सीमांत आणि छोटे शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सरकारचे महत्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि याचबरोबर योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होणे महत्वाचे आहे. तळागाळापर्यंत योजना पोहचवण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तरच आपली “विकसित भारत – 2047” कडे खऱ्या अर्थाने वाटचाल होईल, असे डॉ.रिता शेटीया म्हणाल्या.
सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक्स, पेन्स आणि स्नॅक्स चे वाटप करण्यात आले.
हि कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ग्लोबल एज्युकेटर्स फोरम च्या व्हाइस प्रेसिडेंट एच सी डॉ. सविता शेटीया आणि जनरल सेक्रेटरी कुमकुम लुंकड यांचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमासाठी अनामप्रेमचे अहमदनगर आणि सुखसागर नगरचे प्रकल्प समन्वयक अभय रायकवाड, आनंद मालवे, दीपक माळी आणि ऋषिकेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
समन्वयक दीपक माळी म्हणाले, रिता इंडिया फाउंडेशन करत असलेल्या कार्याला मी सलाम करतो. दिव्यांग तरुणांना आधुनिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अर्थसंकल्पा विषयी माहिती मिळावी, दैनदिन जीवनात खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालने आवश्यक आहे हा विचार रुजवण्याचा डॉ. शेटीया यांनी प्रयत्न केला. यांच्या कार्याला मी मनापासून सलाम आणि कौतुक करतो. अश्या विविध कार्यातून दिव्यांग तरुणांना सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रेरणा नक्कीच रिता इंडिया फाउंडेशन करत राहील. त्याच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
कार्यशाळेत सहभागी झालेला संकेत जाधव म्हणाला कि, डॉ. रिता मॅडम नि “अर्थसंकल्प 2025-2026” या विषयावर अतिशय माहितीपूर्ण आणि अतिशय उपयुक्त सत्र आयोजित केले. त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकल उदाहरणे देऊन अर्थसंकल्प समजून सांगितला. भविष्यात आम्हाला नक्कीच या कार्यशाळेचा उपयोग होईल.