सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या तसेच कॅम्पसमधून निवड झालेल्या विद्यार्थिनींना ‘वॉक ऑफ फेम’ अवॉर्डने सन्मानित करत शहीद महाविद्यालयाचे नेत्रदिपक स्नेहसंमेलन संपन्न
तिटवे:
किर्ती फक्त सिनेमांमधूनच मिळवता येत नसून त्यासाठी क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक अशी अनेक क्षेत्रे असून त्या क्षेत्रामध्ये मुलींनी यश मिळवावे असे प्रतिपादन नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी केले. शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. सिने अभिनेत्री प्रांजल पालकर यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होती.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, कॉलेजने पहिल्याच बॅचच्या अनेक मुलींची नामांकित कंपनीमध्ये प्लेसमेंट करून मोठे यश संपादले आहे. भविष्यामध्ये या कॉलेजच्या मुली निश्चित वेगवेगळ्या देशांमध्ये काम करताना दिसतील.महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा, सांस्कृतिक वसा जपला जावा या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सिनेअभिनेत्री प्रांजल पालकर, मानसोपचार तज्ञ शाल्माली रानमाळे व इंडियन इंजीनियरिंग सर्विस मध्ये निवड झालेल्या शामबाला पाटील यांचा पाटील तसेच विविध कंपनी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थिनींचे तसेच स्पर्धा परिक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सत्कारमूर्तींनी वॉक अॉफ फेम करुन उपस्थितांची मने जिंकली .
याप्रसंगी महाविद्यालयामधून कॅम्पस मधून निवड झालेल्या विद्यार्थिनींच्या पालकांचे सत्कार करण्यात आले. अंजली नकाते, गायत्री सुतार, श्रुती मोहिते, वैष्णवी पाटील, पूजा कांबळे प्रियांका मोरे या विद्यार्थिनी व पालकांचा यामध्ये समावेश होता. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवातील विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. खो खो आणि कब्बडी मध्ये विजेता संघ बी एस्सी मायक्रोबायोलॉजी विभागास तर दुसरा क्रमांक बी एम एम आणि फूड सायन्स या विभागांना मिळाला.
वैयक्तिक खेळामध्ये बुद्धिबळ खेळात इशा कुंभार व प्रियांका बाचनकर यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाले. धावणे मध्ये ऋतुजा महेकर हिला प्रथम आणि वैष्णवी कुंभार व वैष्णवी मगदूम पारितोषिक मिळाले. सोबतच मागील वर्षीच्या प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थिनींच्या सत्कार करण्यात आला.
शहीद महाविद्यालयांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील 90 गावांमधील 600 वर विद्यार्थिंनी शिक्षण घेत असून येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी आधुनिक व्यावसायिक शिक्षण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उदाहरणार्थ कॉम्प्युटर एप्लीकेशन, मास मीडिया, डी एम एल टी, कॉम्प्युटर सायन्स, बीएससी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एमएससी कम्प्युटर सायन्स असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे.
स्वागत व प्रास्ताविक प्रंशात पालकर यांनी केले.कार्यक्रमास युवा नेते अशोक फराक्टे, संस्थेचे उपाध्यक्ष वसंत पाटील, प्रगती पाटील संस्था विस्तार अधिकारी विजय रानमाळे , राजेंद्र मकोटे, डॉक्टर चारुदत्त रणदिवे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर आणि नेहा बरगे यांनी केले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले. आभार कार्याध्यक्ष प्रा.सुनील पाटील यांनी मानले.