सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण: एक मुक्त चिंतन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरात!
कोल्हापूर: वंचितांच्या राष्ट्रीय राजकीय संघर्षाचा वेध घेणाऱ्या, सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण: एक मुक्त चिंतन’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा लवकरच कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, लेखक आणि मार्गदर्शक मा. ज. वि. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सिद्धार्थ कांबळे हे स्वतः लेखक आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेते आहेत.
हा प्रकाशन सोहळा शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
स्थळ: शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, दसरा चौक, कोल्हापूर.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचितांच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक आणि सामाजिक विषयांमध्ये रुची असणाऱ्यांनी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Posted inकोल्हापूर
सिद्धार्थ कांबळे लिखित ‘वंचितांचे राजकारण: एक मुक्त चिंतन’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरात!
