: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उज्वल करणाऱ्या ५२ गुणवंतांचा ‘ब्रँड कोल्हापूर २०२५’ सन्मान सोहळ्यात गौरव
**कोल्हापूर: : कोल्हापूरचे सुपुत्र व नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी, ‘ब्रँड कोल्हापूर २०२५’ सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. गेल्या वर्षभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव मोठे करणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील ५२ गुणवंतांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते दोन ‘जीवन गौरव पुरस्कार’. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेष्ठ टेबल टेनिसपटू शैलजा भोसले यांना ‘ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
याव्यतिरिक्त, पॅरीस ऑलिंपिकमध्ये रोप्यपदक जिंकणारे स्वप्निल कुसाळे, साहित्यिक कृष्णात खोत, यूपीएससी परीक्षेतील गुणवंत बिरदेव डोणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी श्री. बाळ पाटणकर, जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, रविंद्र ओबेरॉय, डॉ. बी. एम. हिर्डेकर, सुधाकर काशीद, अमरजा निंबाळकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, डॉ. आर. एम. कुलकर्णी, रोटरीचे शीतल दुग्गे, निसर्गमित्रचे अनिल चौगले, पद्मा तिवले, अविनाश शिरगावकर, ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
(संघर्षनायक मीडिया करिता)
Posted inकोल्हापूर
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव उज्वल करणाऱ्या ५२ गुणवंतांचा ‘ब्रँड कोल्हापूर २०२५’ सन्मान सोहळ्यात गौरव
