‘बाल शिवाजी मंडळा’कडून अकिवाट येथील वृद्धाश्रमात दिवाळीचा फराळ वाटप; निराधार ज्येष्ठांसोबत साजरी केली ‘पहिली’ दिवाळी
अकिवाट/शिरोळ: दिवाळी सण तोंडावर असताना, शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे माणुसकीचे दर्शन घडले आहे. नरसिंहवाडी येथील प्रतिष्ठित ‘बाल शिवाजी मंडळा’च्या तरुणांनी आपल्या मंडळाला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, सामाजिक बांधिलकी जपत अकिवाट येथील श्रावणबाळ वृद्धाश्रम व अनाथ आश्रम (दुर्गामाता चॅरिटेबल ट्रस्ट संचलित) येथे भेट दिली.
रविवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चार वाजता मंडळाच्या सदस्यांनी आश्रमातील निराधार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवाळीपूर्वीच मोठ्या प्रमाणात फराळ आणि मिठाईचे वाटप केले.
‘पहिली दिवाळी’ या उद्देशाने मदत:
आश्रमातील ज्येष्ठांना मायेचा आधार देण्यासाठी आणि त्यांच्यासोबत आपली ‘पहिली दिवाळी’ साजरी करावी या उदात्त उद्देशाने हे तरुण एकत्र आले होते. घर-परिवारापासून दूर असलेल्या या वृद्ध लोकांना आपल्या मुलांची उणीव भासू नये आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, यासाठी मंडळाच्या सदस्यांनी उत्साहाने आश्रमात वेळ घालवला.
आश्रमाकडून तरुणांचे आभार:
यावेळी आश्रम प्रशासनाच्या वतीने ‘बाल शिवाजी मंडळा’चे विशेष आभार मानण्यात आले. “या दिवाळीमध्ये तुम्ही आमच्यासारख्या निराधारांना आठवण दिली, हीच आमच्यासाठी फार मोठी देणगी आहे,” अशा भावना आश्रमातील लोकांनी व्यक्त केल्या.
या स्तुत्य उपक्रमात मंडळाचे प्रमुख संदेश पाटील, गुरुप्रसाद साळुंखे, यश साळुंखे, महेश शिंदे, साहिल मराठे, गणेश घाटगे, तानाजी साळुंखे, श्रेयश शिंदे, सोहम साळुंखे, पौर्णिक पाटील इत्यादींसह अनेक तरुण मुले सहभागी झाले होते. तरुण मंडळींनी केलेली ही मदत फार मोठी असून, त्यांचे हे सहकार्य असेच चालू राहावे, अशी इच्छा आश्रम प्रशासनाने व्यक्त केली.
Posted inकोल्हापूर
बाल शिवाजी मंडळा’कडून अकिवाट येथील वृद्धाश्रमात दिवाळीचा फराळ वाटप; निराधार ज्येष्ठांसोबत साजरी केली ‘पहिली’ दिवाळी
