वसई-विरार महापालिका भ्रष्टाचार
लाचखोरीतून १६९ कोटींची माया जमवणाऱ्या वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर EDचे आरोपपत्र!
माजी आयुक्तांसह अन्य आरोपींची ७१ कोटींची मालमत्ता जप्त; आतापर्यंत एकूण १६१ कोटींची मालमत्ता कारवाईच्या कक्षेत
वसई-विरार: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी लाचखोरीच्या माध्यमातून तब्बल १६९ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पवार यांच्यासह अन्य आरोपींविरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे.
ईडीने गेल्या दोन दिवसांत माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि अन्य आरोपींच्या मालकीची एकूण ७१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या जप्त केलेल्या मालमत्तेपैकी ४४ कोटी रुपयांची मालमत्ता ही एकट्या अनिलकुमार पवार यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले आहे.
या भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत केलेली एकूण मालमत्ता जप्ती १६१ कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेचे आयुक्त असताना पवार यांनी बांधकाम परवानग्या, अनधिकृत बांधकामे आणि इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारल्याचा ईडीचा आरोप आहे. या गैरव्यवहारातून त्यांनी जमा केलेली १६९ कोटींची रक्कम विविध मालमत्तांमध्ये गुंतवल्याचे तपासात उघड झाले आहे.
ईडीने आरोपपत्र दाखल केल्याने माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावरील कायदेशीर कारवाई अधिक तीव्र झाली आहे.
Posted inवसई - विरार
वसई-विरार महापालिका भ्रष्टाचारलाचखोरीतून १६९ कोटींची माया जमवणाऱ्या वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर EDचे आरोपपत्र!
