⭕ बैठकीच्या सुरवातीला शासनाच्या परिपत्रकाचीच जोरदार चर्चा
रत्नागिरी / प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून, या साहित्याला महाराष्ट्रासह देशात व परदेशातही मोठी मागणी आहे. हे विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. समितीची गेल्या ४४ वर्षांत केवळ २२ खंड व ३ सोअर्स मेटरियल एवढीच कामगिरी राहिली. २००६ पासून तर एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही. म्हणजेच गेल्या १५ वर्षांपासून प्रकाशनाचे कार्य ठप्प पडलेले आहे. बाबासाहेबांच्या साहित्याला (खंडांना) प्रचंड विक्रीमूल्य असतानादेखील राज्य शासन व प्रकाशन समिती या खंडाच्या पुनर्मुद्रण आणि प्रकाशित मराठी खंडाचा इंग्रजी अनुवाद व इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. प्रकाशित अनेक खंडांचे पुनर्मुद्रण कार्य, गेल्या अनेक वर्षांपासून इंग्रजी खंडाच्या मराठी अनुवादाचे केवळ ५ खंड प्रकाशित झाले.
जागतिक स्तरावरील विद्वानांमध्ये गणल्या जाणार्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुतांशी समाजोपयोगी लेखन हे इंग्रजीत व अप्रकाशित असून अद्यापही ते प्रकाशनाच्या वाटेवर घुटमळत आहे. राज्याच्या प्रकाशन समितीवर अनेक धुरंधर नेत्यांनी काम केले. मात्र संपूर्ण साहित्य अद्यापही प्रकाशित झालेले नाही. हेच कार्य उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी आपल्या खांद्यावर घेतले आहे. त्या संदर्भातील आता मराठी अनुवादाचा ६ वा खंड प्रकाशनाच्या नियोजनाबाबत बैठक नुकतीच रत्नागिरी जिल्ह्याच्या अल्पबचत भवन येथे संपन्न झाली.
इतर राज्यांनी यापूर्वीच आपापल्या भाषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित केले. मात्र पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्र राज्य मात्र यात मागे का राहिले? असा प्रश्न संविधानवादयांना पडत आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे भान देणार्या राज्यघटनाकार, प्रकांड पंडित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौखिक आणि लिखित साहित्य राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या 22 खंडांपैकी केवळ 5 खंड मराठीत भाषांतरित झाले आहेत. उर्वरित 16 खंड भाषांतराच्या प्रतिक्षेत आहेत. गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांनी हे खंड त्या-त्या राज्यांतल्या भाषेत यापूर्वीच प्रकाशित केले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या भूमीतून देशाला राज्यघटना देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य मराठीत प्रदीर्घ काळ उपलब्ध नव्हते. राज्य शासनाने आता उर्वरित 16 खंडांचे मराठीत भाषांतर करण्याचे मनावर घेतले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड मराठी भाषांतर खंड 6 या प्रकाशनच्या नियोजनासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. उदय सामंत यांच्या अध्क्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत प्रसारित करण्यात आलेल्या परिपत्रकाचीच सभागृहात जोरदार चर्चा रंगली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, साहित्य प्रकाशित करताना विशिष्ठ एकच वर्गाच्या प्रतिनिधींना परिपत्रकाद्वारे बैठकीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यावरून सभागृहात परिपत्रकाची जोरदार चर्चा सुरू होती. आंबेडकरी चळवळीतील प्रतिनिधीनी परिपत्रकावर केवळ विशिष्ठ एका समाजातिल लोकांना का बोलवण्यात आले? , शासनाच्या परिपत्रकावर धार्मिक, सामजिक संघटनांचा केवळ उल्लेख कशासाठी? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर ना. उदय सामंत म्हणाले की, हा कार्यक्रम शासनाच्या वतीने घेण्यात येणार असून प्रकाशन समारंभाला सर्वच समाजातील प्रतिनिधी येणार आहेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
या बैठकीला जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य मराठीत भाषांतर करताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे मूळ लेखन उद्देशाला धक्का न पोहोचवता भाषांतर करण्यात यावे, या संदर्भात उपस्थितांमध्ये सखोल चर्चा घडून आली.
कार्यतत्पर, कर्तृत्ववान अशा ना.उदय सामंत यांच्याकडे प्रकाशन समितीची जबाबदारी आल्याने आता या कामाला लवकरच न्याय मिळेल अशी अपेक्षा उपस्थित काही प्रतिनिधींनी व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरीत्र साधन प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रकाश आगलावे, रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांच्यासह विविध विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
I?¦ve been exploring for a little for any high-quality articles or blog posts in this kind of area . Exploring in Yahoo I eventually stumbled upon this site. Reading this info So i?¦m glad to show that I have an incredibly excellent uncanny feeling I came upon just what I needed. I such a lot indisputably will make sure to don?¦t disregard this web site and give it a look regularly.