जीएसटी पूर्व थकबाकीदारांसाठी  ‘अभय योजना’: राज्यकर उपायुक्त वैशाली काशिद ;शुक्रवारी इचलकरंजीत मेळावाइ

जीएसटी पूर्व थकबाकीदारांसाठी  ‘अभय योजना’: राज्यकर उपायुक्त वैशाली काशिद ;शुक्रवारी इचलकरंजीत मेळावाइ

जीएसटी पूर्व थकबाकीदारांसाठी  ‘अभय योजना’: राज्यकर उपायुक्त वैशाली काशिद ;शुक्रवारी इचलकरंजीत मेळावा

इचलकरंजी : जीएसटी पूर्व थकबाकीदारांसाठी कोल्हापूर जीएसटी कार्यालयाने ‘अभय योजना 2022’ आणली आहे, याची माहिती देण्यासाठी शुक्रवार (दि.29) दुपारी चार वाजता इचलकरंजी येथील दगडूलाल मर्दा मानवसेवा केंद्र नाकोडा नगर, निरामय हॉस्पिटलजवळ येथे थकबाकीदारांचा मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती राज्यकर उपायुक्त वैशाली काशिद यांनी दिली आहे.जीएसटीचा कायदा अंमलात येण्यापूर्वी काही करदाते थकबाकीदार होते. त्यांना दिलासा देऊन चिंतामुक्त होण्यासाठी जीएसटी कार्यालयाने अभय योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रलंबीत थकबाकी भरण्यासाठी सवलतीच्या दर निर्धारीत केले आहेत. या योजनेची करदात्यांना माहिती होण्यासाठी कोल्हापूर जीएसटी भवन स्वतःहून आपल्या दारी येत आहे. यासाठी थकबाकीदारांचा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात राज्यकर सहआयुक्त (व्हॅट) सुनिता थोरात, नितीन बागर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी थकबाकीदार करदात्यांनी मेळाव्यात उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैशाली काशिद यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *