एक महिन्यात बांधकाम कामगार विषयक ऑनलाईन सिस्टीम नवीन योजनांच्या सह पूर्णपणे सुरू होईल अशी माहिती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी शिष्टमंडळास दिली.
22 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 11 वाजता महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या वतीने श्री विवेक कुंभार यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळामध्ये कॉ शंकर पुजारी सांगली,एडवोकेट कबीर पानसरे कोल्हापूर,अकबर गफूर शेख अहिल्यानगर , मोहसीन शेख संभाजीनगर, समीर राठडकर पुणे, शाहिद सय्यद अहिल्यानगर व रामकिशन कवळे पुणे इत्यादींचा समावेश होता.
चर्चेच्या सुरुवातीस सर्वात महत्त्वाचा प्रश्न कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की सध्या फक्त नवीन अर्ज भरणे व नूतनीकरण करणे हे वेबसाईटवर सुरू आहे बाकी सर्व बंद आहे नवीन अर्ज भरणे सुद्धा संभाजीनगर सारख्या ठिकाणी बंद आहे. तरी याबाबत सर्व सिस्टीम पूर्ण क्षमतेने कधी सुरू होईल याबद्दल विचारणा केली.
या संदर्भात बोलताना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री विवेक कुंभार यांनी सांगितले की संपूर्ण वेबसाईट सुरू करण्याचे आमचे प्रयत्न सतत सुरू आहेत. त्याच्या काही ट्रायल्स आम्ही वेबसाईटवर नवीन योजना चालू करण्यासंदर्भात घेतलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण वेबसाईट नवीन अर्ज भरण्याच्या सुविधासह पंधरा दिवसात चालू होईल असे सांगितले जास्तीत जास्त एक महिना असेही त्यांनी सांगितले.
श्री विवेक कुंभार यांनी असेही सांगितले की अर्ज मंजूर करणे व दुरुस्त करणे संदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आधार कार्ड क्रमांका नुसार मंडळ कामकाज करणार आहे. त्यासाठी आधार कार्ड दुरुस्ती संबंधी व अपडेट साठी आधार कार्ड संदर्भात दिल्ली सरकारकडून परवानगी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यापुढील काळात व्हेरिफिकेशन ची सुद्धा भविष्यकाळात आवश्यकता राहणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
सानुग्रह अनुदान मिळण्यासंदर्भात चर्चा केली असता त्यांनी असे सांगितले की याबाबत महाराष्ट्र शासनास कळवलेले आहे त्यांच्याकडून माहिती घ्यावी.
शिष्टमंडळाच्या वतीने मागणी करण्यात आली की आज 33 लाख अर्ज प्रलंबित आहेत ते त्वरित मंजूर करावे याबाबत श्री विवेक कुंभार यांनी सांगितले की वेबसाईटवर असलेली आकड्यांची माहिती दुरुस्त करणे आवश्यक आहे. तितके अर्ज प्रलंबित नाहीत. तरीसुद्धा प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासंदर्भात आवश्यक सूचना सर्व जिल्ह्यांना कळवण्यात येतील त्यामुळे अर्ज निकाली निघण्यामध्ये मंजूर होण्यामध्ये निश्चितच गती येईल.
तसेच नवीन बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना ज्या 13 जुलै रोजी घोषित करण्यात आलेले आहेत त्याचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
निवेदन दिल्यानंतर उपस्थित कृती समितीच्या सदस्यांची बैठक झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की, अजूनही मागण्या मंजूर होणे फक्त चर्चेच्या पातळीवर आहे बोनस किंवा सानूगृह अनुदानाबद्दलची बद्दलची चर्चा स्पष्ट झालेली नाही. म्हणून 21 ऑक्टोबर 2026 पासून मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय कायम करण्यात आला. याबाबत आझाद मैदान पोलीस स्टेशन मार्फत परवानगी काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
21 ऑक्टोबर 2026 पासून मुंबई आझाद मैदान येथील आंदोलन जोरदारपणे करण्याची तयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या कामगार कार्यकर्ते व बांधकाम कामगारांची यादी आणि नावे कृती समितीकडे पाठवावीत असे आवाहन करणारे पत्रक महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती कृती समितीचे राज्यसभा राज्य निमंत्रक ज्येष्ठ कामगार नेते कॉ शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिलेली आहे.
