गौरवाडमधील कृष्णा नदीकाठची केबल चोरी उघडकीस; तिघे गजाआड कुरुंदवाड पोलिसांची कारवाई : १५ हजारांची केबल जप्त, आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गौरवाडमधील कृष्णा नदीकाठची केबल चोरी उघडकीस; तिघे गजाआड कुरुंदवाड पोलिसांची कारवाई : १५ हजारांची केबल जप्त, आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गौरवाडमधील कृष्णा नदीकाठची केबल चोरी उघडकीस; तिघे गजाआड

कुरुंदवाड पोलिसांची कारवाई : १५ हजारांची केबल जप्त, आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कुरुंदवाड, ता. २० : गौरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारीची केबल चोरी करणाऱ्या तिघा संशयितांना कुरुंदवाड पोलिसांनी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. किरण ढुंडाप्पा कांबळे (वय ३१, रा. आगर रोड, धनगरवाडा, शिरोळ), इंद्रसेन विनोद कांबळे (वय १९, रा. अर्जुनवाड, ता. शिरोळ) आणि अमर लहू कांबळे (वय ३८, रा. बौद्धविहार जवळ, कनवाड, ता. शिरोळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गौरवाड येथील शेतकरी पवनकुमार तातोबा कुंभोजे (वय ३५) यांची गावातील गट क्रमांक ४२ मध्ये कृष्णा नदीकाठी शेतजमीन आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुंभोजे व त्यांच्या शेजारील इतर शेतकऱ्यांच्या पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारीची पट्टी केबल कापून चोरून नेली होती. यामध्ये सुमारे १५ हजार रुपये किमतीची २६० मीटर काळ्या रंगाची केबल चोरीस गेली होती. याप्रकरणी कुंभोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ४३१/२०२६) दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून वरील तिघांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना २० नोव्हेंबर रोजी अटक केली असून, आरोपींनी दाखवलेल्या ठिकाणाहून चोरीस गेलेली इलेक्ट्रिक मोटारीची पट्टी केबल दोन पंचासमक्ष जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार अ. डोईजड आणि पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानदेव सानप, सहाय्यक फौजदार राजेंद्र इटासपुजारी, पोलीस नाईक संतोष साबळे व पोलीस अंमलदार नितीन साबळे यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *