राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहर पथकाचा छापा; गोवा बनावटी मद्य वाहनासह २ लाखांचा मुद्देमाल जप्त​; एक आरोपी अटकेत; वाहतुकीसाठी वापरलेली ओला इलेक्ट्रिक दुचाकीही एक्साईजच्या ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहर पथकाचा छापा; गोवा बनावटी मद्य वाहनासह २ लाखांचा मुद्देमाल जप्त​; एक आरोपी अटकेत; वाहतुकीसाठी वापरलेली ओला इलेक्ट्रिक दुचाकीही एक्साईजच्या ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहर पथकाचा छापा; गोवा बनावटी मद्य वाहनासह २ लाखांचा मुद्देमाल जप्त

​एक आरोपी अटकेत; वाहतुकीसाठी वापरलेली ओला इलेक्ट्रिक दुचाकीही एक्साईजच्या ताब्यात

अमोल कुरणे
​कोल्हापूर,दि. २८ (प्रतिनिधी)
गोवा बनावटीच्या बेकायदेशीर विदेशी दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्या एकास राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) कोल्हापूर शहर पथकाने रंगेहात पकडले. मंगळवार पेठ परिसरातील यश अपार्टमेंटमध्ये टाकलेल्या छाप्यात दारू आणि वाहनासह एकूण १,९०,१३० (एक लाख नव्वद हजार एकशे तीस) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तात्रय मधुकर कानकेकर (वय ५६, रा. मंगळवार पेठ, बेलबाग, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची एक्साईज कोठडी सुनावली आहे.


​राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार, तसेच कोल्हापूर अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पथक परिसरात गस्त घालत होते. गस्ती दरम्यान बेलबाग परिसरात एक व्यक्ती ओला इलेक्ट्रिक दुचाकीवरून (क्र. एम एच ०९ जी आर ०८७१) संशयास्पद पोते घेऊन चालल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले आणि पोत्याची झडती घेतली. यावेळी त्यात गोवा बनावटीच्या ‘मॅकडॉल नंबर वन’ व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या १२ सीलबंद बाटल्या आढळल्या.
संशयित आरोपी दत्तात्रय कानकेकर याची चौकशी केली असता, त्याने मंगळवार पेठेतील बी वार्ड, यश अपार्टमेंट (घर नं. २४६८) येथील राहत्या घरी दारूचा साठा केल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने या घरावर दारूबंदी कायद्यांतर्गत छापा टाकला. या कारवाईत घरातून गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या उच्च प्रतीच्या ७५० मिली क्षमतेच्या एकूण ९६ बाटल्या (८ बॉक्स) जप्त करण्यात आल्या.
कारवाईत १,१०,१३५ रुपये किमतीची बेकायदेशीर दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली ८० हजार रुपये किमतीची ओला दुचाकी असा एकूण १,९०,१३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​ही कारवाई दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत यांनी कोल्हापूर शहर निरीक्षक आर. डी. वाजे यांच्या सहकार्याने केली. दु. निरीक्षक जे. एस. शिंदे, एस. ए. पाटणे, कॉन्स्टेबल प्रसाद पाटील, पंकज खानविलकर, इंद्रजीत बिडकर, सचिन काळेल आणि महिला वाहन चालक कॉन्स्टेबल किरण चोपडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आरोपीस कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.कॉन्स्टेबल प्रसाद पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दिली असून, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *