पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या फलकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन

पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या फलकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन

पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या फलकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उद्घाटन

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा आठवले यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज, दिनांक २४ ऑक्टोबर २०२६ रोजी संघटनेच्या नवीन फलकाचे (बोर्डाचे) मोठ्या उत्साहात व दिमाखात उद्घाटन करण्यात आले.


सामाजिक न्याय व हक्कांसाठी लढणाऱ्या पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या कार्याला या फलक उद्घाटनामुळे नवी ऊर्जा मिळाली असून, यावेळी कार्यकर्त्यांनी ‘जय भीम, नमो बुद्धाय’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या उद्घाटन सोहळ्याला संघटनेचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र वालिया सर आणि ज्योतीताई झरेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मनीषाताई मोरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आनंद प्रकाश संचिती, प्रकाश संचिती, प्रिया अरुणा जाधव आणि तन्वी जाधव यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून व फित कापून या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *