डॉ. बाबासाहेब आंबेडकरच संविधानाचे शिल्पकार; राज्यघटनेतून समस्त मानवजातीला समता व न्याय’ – प्रा. आत्माराम गोडबोले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरच संविधानाचे शिल्पकार; राज्यघटनेतून समस्त मानवजातीला समता व न्याय’ – प्रा. आत्माराम गोडबोले

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरच संविधानाचे शिल्पकार; राज्यघटनेतून समस्त मानवजातीला समता व न्याय’ – प्रा. आत्माराम गोडबोले

नायगाव पूर्व (वसई-विरार) : युगपुरुष, महामानव आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांनी केवळ वंचित आणि उपेक्षित घटकांनाच नव्हे, तर समस्त मानवजातीच्या स्वातंत्र्य, जगण्याचा अधिकार आणि कल्याणाचा विचार संविधानातून मांडला, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी कथा लेखक व कवी प्रा. आत्माराम गोडबोले यांनी केले.

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वसई-विरार महानगर जिल्हा शाखेच्या वतीने नायगाव पूर्व येथे आयोजित संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

लोकशाही भक्कम करणारा आदर्श विचार

पुढे बोलताना प्रा. गोडबोले म्हणाले की, देशात लोकशाही कशी भक्कम होईल यासाठी बाबासाहेबांनी एक आदर्श राज्यघटना देशाला दिली. ते समस्त मानवजातीचे उद्धारक असून त्यांनी सर्वच क्षेत्रांना न्याय मिळावा, हाच केंद्रबिंदू मानला. राज्यघटनेच्या माध्यमातून हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणत त्यांनी समतेचा हक्क दिला आणि अस्पृश्यता नष्ट केली.

“वो आदमी नही मुकम्मल बयान है… माथे पे जिसके चोट का गहरा निशान है… सामान कुछ नही फटे हाल है… मगर झोले मे उसके पास संविधान है…” — या ओळींतून सामान्य माणसाची व्यथा आणि संविधानाचे सामर्थ्य नेमकेपणाने अधोरेखित केले.

हक्क, अधिकार आणि समतेची ग्वाही

भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायद्याच्या चौकटीत आणून प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचा अधिकार तसेच शिक्षणाचा हक्क बहाल केल्याचे त्यांनी नमूद केले. धर्म, वंश, जात, भाषा, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करता येणार नाही, हा समतेचा विचार संविधानाने दिला. विविध जाती, पंथ, वर्ग आणि धर्मांना लोकशाहीचे महत्त्व समजावून सांगत बाबासाहेबांनी लोकशाहीला सर्वश्रेष्ठ स्थान दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. अरुणजी मेढे, महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा ज्योतीताई झरेकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी समिती प्रमुख महेंद्र वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲड. किरणराव मोरे, पालघर जिल्हा अध्यक्षा आशा मोरे, पालघर जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि नागरिकांना उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे वसई-विरार महानगर जिल्हा अध्यक्ष संकेत भटकर यांनी केले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *