गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे अटकेतअनंत चतुर्थी ड्रायडे च्या पार्श्वभूमीवर एक्साईज कोल्हापूर शहर पथकाची कारवाई

गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे अटकेतअनंत चतुर्थी ड्रायडे च्या पार्श्वभूमीवर एक्साईज कोल्हापूर शहर पथकाची कारवाई

गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे अटकेत

अनंत चतुर्थी ड्रायडे च्या पार्श्वभूमीवर एक्साईज कोल्हापूर शहर पथकाची कारवाई

कोल्हापूर,दि. २२ (प्रतिनिधी)
अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बदडगा उगारला आहे. कोल्हापूर शहर पथकाने मंगळवारी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीच्या बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणारी मारुती इको कार आणि दारूसह एकूण ७ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे आणि प्रभारी कोल्हापूर विभागीय उपआयुक्त तथा कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उप-अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. वाजे व दु. निरीक्षक सत्यवान भगत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कोल्हापूर शहर पथकाने संभाजीनगर ते हॉकी स्टेडियम रोडवरील निर्माण चौक परिसरात सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या मारुती सुझुकी इको कार एम.एच.-०९-एच.ई.-६५०९ ची पाहणी केली असता, त्यात गोव्याहून आणलेल्या विविध ब्रँडच्या सिलबंद दारूचे ९ बॉक्स छुप्या पद्धतीने लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले.
जप्त दारू ९७ हजार ५०० व
वाहनाचे ७ लाख असा ७ लाख ९७ हजार ५०० चा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सुनील दत्तात्रय तांबट (वय ३५, रा. राजाराम चौक, गंजीमाळ, वाशी नाका रोड, कोल्हापूर) आणि अभिजीत किरण पोवार (वय ३९, रा. मठ तालीम गल्ली, शनिवार पेठ, कोल्हापूर) या संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, जे. सी. शिंदे, एस. ए. पाटणे, जवान प्रसाद पाटील, सचिन काळेल, इंद्रजित बीडकर, पंकज खानविलकर यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध तपास अधिकारी सत्यवान भगत करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *