गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघडकीस; सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त, कोल्हापुरात एकाला अटक

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघडकीस; सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त, कोल्हापुरात एकाला अटक

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघडकीस; सव्वादोन लाखांचा मद्यसाठा जप्त, कोल्हापुरात एकाला अटक

अमोल कुरणे वृत्तसेवा, कोल्हापूर

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात होणारी बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि साठवणूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाच्या कोल्हापूर शहर पथकाने धडक कारवाई सत्र सुरू केले आहे. मंगळवार पेठेतील संभाजीनगर, रेसकोर्स परिसरात एका घरावर छापा टाकून पथकाने २ लाख १९ हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेसकोर्स परिसरातील एका घरात परराज्यातील दारूचा साठा विक्रीसाठी आणून ठेवल्याची गुप्त माहिती एक्साईज पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने गुरुवारी (३ सप्टेंबर) संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. या कारवाईत विविध नामांकित ब्रँडच्या ७५० मिली क्षमतेच्या २१६ सीलबंद बाटल्या (एकूण १८ बॉक्स) हस्तगत करण्यात आल्या.

याप्रकरणी तौसीफ ताजुद्दीन सौदागर (वय ४१, रा. रेसकोर्स, मंगळवार पेठ, कोल्हापूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही धडक कारवाई विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे आणि सह आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार पार पडली. जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उप-अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहर निरीक्षक आर. डी. वाजे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, जे. सी. शिंदे, एस. ए. पाटणे तसेच जवान प्रसाद पाटील, सचिन काळेल, इंद्रजित बीडकर, पंकज खानविलकर व किरण चोपडे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करत आहेत. सणासुदीच्या काळात अशा अवैध धंद्यांवर अधिक तीव्र कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *