अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा
सांगली निवारा भवन येथे अखिल भारतीय श्रमिक यात्रा नियोजन करण्यासंबंधी 27 जानेवारी सकाळी 11 वाजता महत्त्वपूर्ण बैठक झाली.
अखिल भारतीय श्रमिक यात्रेचे सांगलीमध्ये नियोजन करण्यासंदर्भात ठरविण्यात आले की. 27 जानेवारीपासून या देशव्यापी यात्रेची सुरुवात दक्षिण भारतातून झालेली असून ती यात्रा 11 फेब्रुवारी रोजी सांगलीत पोहोचत आहे.
त्या निमित्ताने खालील प्रमाणे आजच्या बैठकीमध्ये कार्यक्रम ठरवण्यात आले.
तारीख 11 फेब्रुवारी रोजी सांगली निवारा भवन येथून यात्रा मिरवणुक सुरुवात होऊन पुष्पराज चौक, सिव्हिल हॉस्पिटल, गारपीट चौक मधून मराठा सेवा सांस्कृतिक भवन मध्ये जाहीर यात्रा सभा कार्यक्रम होईल.
वर्किंग पीपल्स कोअॅलिशन (WPC) ही भारतातील असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांचे स्वतंत्र, पक्षपाती नसलेले नेटवर्क आहे.
ही यात्रा का?
असंघटित कामगार—रस्त्यावरील विक्रेते, घरगुती मदतनीस, प्लॅटफॉर्म (गिग) कामगार, बांधकाम मजूर, घरून काम करणारे कामगार, लैंगिक कामगार, मच्छीमार, योजना आणि आरोग्यसेवा कामगार, जंगल कामगार, कृषी मजूर, वस्त्र कामगार आणि अशा असंख्य इतर—भारतातील एकूण कामगार शक्तीच्या ९०% पेक्षा जास्त आहेत. ते देशाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहेत आणि त्यांच्या श्रमातून देशाची संपत्ती वाढत आहे. तरीसुद्धा, त्यांना अत्यंत कमी वेतन, असुरक्षित कामाची परिस्थिती, नोकरीची कोणतीही सुरक्षा नाही, मर्यादित किंवा नसलेले सामाजिक संरक्षण, तसेच सन्मान, मानवी हक्क यांची कमतरता भासते.
जिल्ह्यातील बांधकाम कामगार, देह विक्री करणाऱ्या महिला, आशा महिला व सफाई काम करणारे कामगार इत्यादीनी व आणि अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रा जास्तीत जास्त संख्येने जमून यशस्वी करण्यासाठी 27 जानेवारी रोजी महत्वपूर्ण बैठक झाली.
पुढील तयारीची बैठक 7 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता निवारा भवन येथे होईल. तरी या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी 7 फेब्रू रोजी सकाळी अकरा वाजता सांगली निवारा भवन येथे उपस्थित रहावे असे आवाहन करीत आहोत.
बैठकीसाठी कॉ शंकर पुजारी, शाईन शेख, शांतीलाल काळे, रेणुका काळे, सपना कांबळे, रजाक शेख, श्वेता नाईक , जहीद मोमीन, सीमा वाघमारे, सतीश सूर्यवंशीव पांडुरंग मंडले इत्यादी उपस्थित होते.
असे पत्रक संग्राम संघटनेच्या
मीना शेशू व निवारा बांधकाम कामगार संघटनेचे कॉ शंकर पुजारी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिलेल आहे.