स्वतंत्र भारतातील गुलामांचा प्रजासत्ताक दिन….!

स्वतंत्र भारतातील गुलामांचा प्रजासत्ताक दिन….!

स्वतंत्र भारतातील गुलामांचा प्रजासत्ताक दिन….!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

नमस्कार वाचक मान्यवर मित्रांनो,
सदरील लेख अनेक लेखसामग्री असेल किंवा काही ओळी अथवा काही उतारे यांच्यातून साभार घेत आहे…

आपल्याला सदैव गुलाम आणि कस्पटासमान मानणाऱ्या षंढ राजकारणी लोकांनी आपल्याला गुलामीच्या जोखडात कायमच ठेवण्याचा प्रयत्न केलाय…
त्यांनी व्यवस्थाच अशी बनवली आहे की आमचे हात बांधलेले राहावेत, तसेच पायात बेड्या राहाव्यात आणि तोंड शिवलेले असावे नेहमीच…!

त्यांनी मोठ्या चलाखीने आमच्या कपाळावर ” आम्ही स्वतंत्र आहोत ” असा शिक्का मारला आहे…!
आणि त्यात कडी ही की, आमचे तोंड उघडे ठेवून त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले आहे…!
हे राजकारणी कल्याणकारी व्यवस्थेचे घटनात्मक मठाधिपती असतात, राजे असतात आणि आम्ही या खोट्या व जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचा गवगवा असलेल्या लोकशाहीतील खरे गुलाम…!

खरंच आम्ही या देशाचे गुलाम नागरिक आहोत…!

स्वातंत्र्यपूर्व काळात आमच्यावर ब्रिटिशांचे राज्य होते…
गरीब आणि असहाय्य भारतीय जनतेला लूटायचे आणि त्यांचे राजा- राणी आणि त्यांचे राज्य सांभाळणाऱ्या सरदारांनी (जे भारतीय असत) वैभवात सत्ता उपभोगायची हाच इंग्लडच्या राज्यकर्त्यांचा प्रमुख उद्देश होता….
इंग्रजांनी आमच्यावर तब्बल दीड शतक राज्य केले….
इंग्रज मोठे चतूर,लबाड आणि धूर्त…!
फोडा आणि राज्य करा या नीतीने , त्यांनी भारतीय जनतेला नेहमीच मूर्ख बनवून अनन्वित अत्याचार व शोषण केले….
भारतातून ब्रिटिशांची सत्ता कधीच अस्ताला जाणार नाही असे नेहमीच बोलले जायचे…
संस्थानिक आणि धनाढ्य लोक त्यांचे मांडलिक (ताटाखालचे मांजर) झाले होते….
परतुं या देशातील गरीब आणि सामान्य जनतेनी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग आणि अबुल कलाम आझाद असो अथवा अश्फाकउल्लाह खान अथवा राजगुरू असो अशा विविध प्रवाही नेतृत्वाच्या बरोबरीने प्रखर लढा देवून इंग्रजांची सत्ता उलथवून लावली….
ज्यांच्या राज्यावर सूर्य मावळत नव्हता ते बलाढ्य इंग्रज साध्या भोळ्या भारतीयांनी म्हणजे आपल्या वाडवडिलांनी पळवून लावले….
१९४७ ला भारत स्वतंत्र झाला….
आणि २६ जानेवारी १९५० पासून सामान्य जनता या देशाची मालक झाली….
आता ती कितपत मालक आहे हे पाहावं लागेल…
परतुं गेल्या ७५ वर्षात आपल्यासारख्या सामान्य माणसाला मी या देशाचा मालक आहे, असा अनुभव कधीच आला नाही व येतही नाही….
कारण गोरे इंग्रज देशातून गेले पण त्यांचे भारतीय रूप म्हणजे काळे इंग्रज इथंच सोडून गेले…

आपल्याला आपल्याच मालकी व सत्ता असलेल्या काळात आजही सामान्य माणसाला रेशनच्या दुकानामध्ये धड रेशन मिळत नाही….
आजार असो अथवा सामान्य तापाने फणफणलेल्या गरीबाला सरकारी दवाखान्यात एक साधी गोळी मिळत नाही…
अंगणवाडीतील लहान मुलांच्या चिक्की अथवा खाऊ मध्ये भ्रष्टाचार होतो….
गरीबाच्या मुलांना सरकारी शाळेत धड शिक्षण मिळत नाही….
त्यांना शिकवण्याचे कर्तव्य पार पाडणारे शिक्षक गलेलठ्ठ पगार घेऊनही आपल्या कर्तव्याला जागत नाहीत…
ग्रामीण भागात तलाठी लाच दिल्याशिवाय साधा सात-बारा देत नाही….
घाम गाळून अन्नाच्या राशी लावणारा शेतकरी हमीभाव नसल्याने कर्जबाजारी होऊन गळफास लावून घेतो….
गावात अठरा विश्वे दारिद्र्य आल्याने उजाड झालेले गरीबांचे तांडे शहरात आणि महानगरात झोपडपट्टी नावाच्या नरकात जावून राहू लागतात….
व धारावी असेल अथवा इतर कुठल्याही झोपडपट्ट्या उदयास येतात…
जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही लाच द्यावी लागते….
म्हणजे मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती देखील लोकं सोडत नाही…
तहसीलदाराकडे तक्रार करा, कलेक्टर साहेबांकडे तक्रार करा अथवा स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या आमदाराकडे करा….
सामान्य माणसांच्या तक्रारीची कुठेच दखल घेतली जात नाही व त्याला दाद मागता येत नाही…
कारण सरंपचापासून ते राष्ट्रपती पर्यंत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीची एक अदृश्य टोळी बनलेली दिसते….
या टोळीला साथसंगत करण्यासाठी गावाच्या तलाठ्यापासून ते तहसीलदार, कलेक्टर मार्गे केंद्रातील मुख्यसचिवापर्यंत एक पर्यायी टोळी ही निर्माण झाल्याचे दिसते….
म्हणजे ती एक शृंखला निर्माण झालेली असते…
नेता आणि नोकरशाहा या दोन्ही टोळ्या मिळून एकमेकांचे हितसंबध सांभाळताना दिसतात….
या टोळ्या सामान्य माणसांच्या घामातून जमा केलेल्या कररूपी संपत्तीतून लोककल्याणाच्या नावाखाली खा, खिसे भरा आणि लूटा हा एक कलमी कार्यक्रम साथसंगतीने राबविताना दिसतात….
कारण सामान्य माणूस नावाच्या गुलाम नागरिकांकडून पाच वर्षातून एकदा मत लूटन घ्यायचा एककलमी राष्ट्रीय कार्यक्रम उरकून घेतला,
की मग आजही या प्रातिनिधीक लोकशाहीत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे सरकारी बाबू हे मिळून आम्हीच सरकार आहोत असे घोषीत करून राज्य सुरू करतात….
गोरे इंग्रज गेले परतु आजही काळया इंग्रजाचे राज्य सुरू आहे, ही प्रचिती त्यामुळेच पदोपदी येते….
गेल्या पंचाहत्तर वर्षातील लोकशाहीचे हे एक प्रातिनिधीक चित्र आहे….

तपशीलात पाहिले तर आज प्रातिनिधीक लोकशाहीचे चित्र अशाप्रकारे दिसून येते….

आपण पाहतो की निवडून येण्या अगोदर सरपंच पदाचा उमेदवार गावात सगळयासमोर हात जोडतो परंतु निवडून आला की गावात संरपचाची हुकूमशाही सूरू होते….
ज्याला धड सायकल नव्हती तो महिंद्रा एसयूव्ही अथवा फॉर्च्युनर गाडीचा मालक बनतो…
निवडून येण्या अगोदर आमदारकीचा उमेदवार सगळ्या मतदारसंघातील लोकांच्या पाया पडतो….
आणि निवडून आला की तो तालुक्याचा हुकूमशहा बनतो….
(असे हुकूमशहा प्रत्येक मतदारसंघात आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही…)
सामान्य लोक दूर बाजूला फेकले जाऊन आमदार आणि त्याच्या चमच्यांचे दरबारी राजकारण सुरू होते….
त्याच प्रमाणे खासदार जिल्ह्याचा हुकुमशहा बनतो….
राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री लोकांशी वागताना हुकुमशहा असल्यासारखे वागतात….
पंतप्रधानांना सामान्य माणूस भेटू शकत नाही…..
कारण त्यांच्याभोवती नेहमीच ५०० पोलीसांचा गराडा सुरक्षेसाठी कायम असतो….
२५ लालदिव्यांच्या गाड्यांमधील कोणत्या काळया काचाच्या आड आम्ही निवडून दिलेला सर्वोच्च सेवक बसला आहे हे आम्हाला कळत सुद्धा नाही….
आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीत मालक म्हणून एक निवेदन देवू शकत नाही….
फारच हट्ट करून पंतप्रधानांना भेटायचे ठरविले तर पोलीस आम्हा सामान्य लोकांच्या पाठीवर लाठ्या-काठ्या घालतात….
सामान्य माणसांची म्हणजे या देशाच्या मालकाची हीच काय ती किंमत…?
भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली….
पण आज देशाच्या राजकारणाचे चित्र अंत्यत भेसूर झाले आहे….
आज (सन्माननीय अपवाद वगळता) देशातील गावा-गावांत सरंपचांची हुकुमशाही चालू आहे….
शहरावर महापौर, नगराध्यक्षांचीच दादागिरी सुरू आहे….
राज्यावर मंत्र्यांची दबंगशाही सुरू आहे….
मुख्यमंत्र्यांची बेलगाम हिटलरशाही सुरू आहे….
तर देशावर सत्ताधारी व विपक्ष व त्यांच्या पिळावली, ठेकेदार आणि विकृत भांडवली शक्तीची लूटशाही सुरू आहे….
हे सगळे का होते आहे….?
कारण प्रातिनिधीक लोकशाहीचा अतिरेक झाला आहे….
आणि तो अतिरेक आमच्या अनाठायी वृथा अहंकारामुळे झालाय…
सत्तेत असल्याने जनतेचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींकडे व सरकारी बाबुंकडे केंद्रीत झाले आहेत….
देशाचा प्रतंप्रधान हा सत्ताधारी पक्षाच्या हातातील आणि त्याच्या पक्षाची मातृसंस्था असलेल्या दलाचे बाहुले बनत असेल तर घटनात्मक सत्तेचा केंद्रबिंदू नको तेथे एकवटला जातो….
आणि प्रचंड अशी करोडो आणि अब्जावधीच्या घोटाळ्यांची मालिका सुरू होते….
(निरव मोदी, विजय मल्ल्या, अनिल अंबानी, अदानी याचे जिवंत उदाहरण…)
देशासमोरील मोठे घोटाळे कोणी व कसे केले…?
या न्यायालयीन चौकशीमध्येच एक मानवी पिढी संपून जाते….
(टू जी स्पेक्ट्रम घोटाळा आठवून बघा..)
नवे घोटाळे सुरूच राहतात….
वी द पिपल ऑफ इंडिया (आम्ही भारताचे लोक) असहाय्य आणि हतबल असल्याचे दिसून येते….
या देशातील राज्यकर्त्यांनी उच्चवर्ग व उच्चमध्यमवर्गीयांचा अपेक्षाभंग केल्याने ते मतदान सुद्धा करीत नाहीत….
(मोठमोठ्या शहरातील लोकं मतदानाच्या दिवशी सहलींवर जातात हे जाणून आहातच आपण..)
कोणत्याही निवडणूकीत सरासरी ५० – ५३ टक्के मतदान होते….
त्यातील मोठा वाटा हा शहरी झोपडपट्टी व ग्रामीण गरीबांचा असतो….
गरीब लोकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये भावाने मते विकत घेवून लोकप्रतिनिधी, नोकरशहा, ठेकेदार आणि भांडवलदार यांची चौकडी या देशावर राज्य करीत करते म्हणून म्हणावेसे वाटते की हे सामान्य माणसांचे राज्य नाही….
जाताजाता,

आपली जनता सरकारसाठी आहे परंतु आपले सरकार जनतेसाठी नाही अशी दुर्भाग्यपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे….

लोकप्रतिनिधींची राजनिती अमरे रहे !
तसचे गुलाम नागरिकांची गुलामीही अमर रहे !!
आम्ही हतबल आहोत की लढवय्ये आहोत…?
हाच प्रश्न आता निर्माण झाल्यावाचून राहत नाही…
आणि आपण लढवय्ये की हतबल गुलाम आहोत याचा फैसला येणारा काळच करेल….
तोपर्यंत रात्र वैऱ्याची आहे आणि काळाकुट्ट अंधार आपल्या देशाच्या भविष्यात वाढून ठेवला आहे हे नाकारता येणार नाही…

विचार पटल्यास शेअर करा, आपले विचार व्यक्त करा, सूचना द्या अथवा सर्वदूर हा संदेश आपली देशाप्रति जबाबदारी म्हणून पोहोचवा इतकीच माफक अपेक्षा…!

                    आपलाच शब्दसाधक:-

         ✍🏻 प्रा. हबिबखान पठाण (शब्दकुंदन)...
            (प्रजासत्ताक देशातील राजकीय गुलाम)...

@highlight

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *