परभणी संविधान विटंबना सोमनाथ सूर्यवंशी व विजयदादा वाकोडे मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी असे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी दिले होते या न्यायालयीन चौकशी पुढे काय झाले असा सवाल करत खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने तहसीलदार हातकणंगले तालुका यांना निवेदन देण्यात आले
परभणीतील संविधानाची विटंबना करणाऱ्यासमावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व कलम 176 (1A)CRPC अन्वेय या प्रकारा ची तातडीने चौकशी व्हावी व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वेय व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कलम 3(1) आणि 3(2) प्रमाणे गुन्हे दाखल करावेत सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकारी व तेथील जिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनोशवादाचा गुन्हा दाखल करावा व ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध वस्तीमध्ये जाऊन मारहाण करणाऱ्या सर्व पोलीसांच्या वर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावे व त्यांच्यावर कारवाई व्हावी असे निवेदन देण्यात आले. व पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध क कडक कायदे करावेत व सर्व मागण्यावर मुख्यमंत्री यांनी तातडीने पावले उचलून पुढील आठ दिवसात परभणी प्रकरणात न्याय द्यावा अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनात देण्यात आला.
परभणी प्रकरणी मागण्यांचे निवेदन पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने च्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हातकणंगले तालुका तहसीलदार यांना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे हातकणंगले तालुकाध्यक्ष अशगर पेंढारी हातकणंगले तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत चौगुले तरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा – मच्छिंद्र रुईकर
