उन्हाळा सुरु झाला असून मार्च महिन्यातच तापमानाचा पारा लक्षणीय वाढला आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक हवामान केंद्र, मुबईने राज्यात 1 एप्रिल 2022 पर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तीव्र तापमाणाच्या या दिवसांमध्ये उष्माघाताचा धोका नाकारता येत नाही. उष्माघात झाल्यास काय केले पाहिजे याबाबत बहुतांश जणांना माहिती नसते. तुम्हाला देखील याबाबत माहिती नसेल तर काळजी करू नका. त्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतच्या उपाययोजनांविषयी जाणून घ्या.
⭕️ अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावे.
हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, सनकोट, बुट व चपलांचा वापर करावा.
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
आवश्यकता असेल तरच उन्हात बाहेर पडावे. उन्हात जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचे सेवन करा.
उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत.