महाराष्ट्र देशी भिक्षा घेशी
((अधिमान्यता राजकारण चिकित्सा))
माणसांच्या मोठेपणाचे इंगित काय? माणसं मोठी होतात म्हणजे नेमकं काय असत ?विचाराने मोठी माणसं होण ती तशी असं न ही समाजाची गरज असते पण जातीची माणसं मोठी करण आणि मोठी च असतात अस म्हणण ही कृत्तक भावना असते
या भावने मुळेच ईथे विचार पुढे जात नाही आणि जात ही नाहीशी होत नाही यापैकी कोणीही एका वेळी पराभूत होत नाही भारतात मात्र विचार हा नेहमी जातीने पराभूत केल्याचे दिसून येते
विचारांची मोठी माणसे जातीचा ऑक्टोपस त्यांना गिळंकृत करत असतो आणि त्या व्यक्तीच्या महात्मा पेक्षा विचारांची हत्या नेहमी होत राहते हे भारतीय समाजात सर्व कालखंडात का होत आहे ? हे केले जाते आहे काय ? याची कारणे कोणती आहेत? हे थांबवायचे कसे यासाठी कोणत्या उपायांची गरज आहे? हे जर असेच चालू दिले तर येथील विचारविश्वाचे आणि जातीय ऑक्टोपसचे काय होणार आहे? यासारखे अनेक प्रश्न अनेकांना पडतात म्हणून या प्रश्नांचा शोध घेणे हे विचार वास्तव तपासण्या सारखे आहे मुळात
विचार आणि कार्य हे व्यक्तीला आणि समाजाला प्रगत व मोठे बनवते त्या व्यक्ति चे कार्यही समाजाप्रती असलेली व्यक्तीची बांधिलकी ची व निष्ठा वाढवते त्या व्यक्तीची कार्यनिष्ठा त्या व्यक्तीची समाज निष्ठा यातूनच व्यक्तीच्या विचार निष्ठेचे महत्त्व समाजाच्या प्रति वाढू लागते त्या व्यक्तीच्या कार्याची निरपेक्षता हे विचाराचे श्रेष्ठत्व असते कोणत्याही प्रकारचे विचार हे व्यक्ती आकलन अनुभव कृती पूर्वसुरींचा इतिहास वर्तमानाची गरज बदलांचे अवकाश यातून विचार विकसित होत राहतात व्यक्ती हे अनुभवातूनच सिद्ध करत जाते विचारांचे अस्तित्व ही समाजाला सहज न कळणारी अमूर्त गोष्ट असते विचार कृतीतून आचरणातून प्रतीत होतात ते दाखवता ही येतात सभोवताली वर्तमानात असंख्य प्रकारचे विचार समाजाच्या आचरणात आलेले असतात भविष्यात आचरणात येऊ शकतात समाज जीवनात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती या त्या विचाराचे
आचरण स्वयम् विचार निष्ठा व आनंद यासाठी जगत असतात कार्यरत असतात आयुष्य व्यतीत करतात काम करीत राहतात कामाची उपयुक्तता त्याचे महत्त्व त्यांना स्वतः पटलेले असते त्यामुळे कामाच्या बाबत त्यांची समर्पित जगणे ही त्यांची कार्यनिष्ठा असते कार्यनिष्ठा आणि विचार निष्ठा या दोन्हीही एकत्रित वाटचाल करीत असतात या दोन्ही मध्येच प्रत्येक व्यक्तीचे कमी-अधिक स्वरूपाचे मौलिक जगणे असते वागणे असते विचाराची साक्षरता म्हणजे तरी काय? हे समाजात अद्याप रुजले नाही विचार भिन्न प्रकारचे असतात विधायक व विघातक समाज हितेशी व समाज द्वेषी असे विचार च्या अनेक प्रकार असतात व्यवस्था केंद्रीय व माणूस केंद्रे जात केंद्री व विचार केंद्रे वर्तमान वादी व भूतकाळ वादी समस्या निरसन वादी समस्या निर्माण वादी समाज एकत्मवादी समाज विघटनवादी अशा असंख्य पातळ्यांवर विचारांचे अस्तित्व व्यक्ती साकारत असतात व्यक्ती या विचाराच्या निर्माण कर्त्या असतात व्यक्ती विचाराच्या प्रसारक असतात व्यक्ती विचाराच्या अन्वेषक असतात व्यक्ती विचारा ला विरोधही करतात व्यक्ती विचाराच्या स्वीकार कर्त्या सर्वात शेवटी असतात विचाराच्या या विकास टप्प्यांवरील प्राधान्यक्रम लक्षात घेतले तर विचारांचा पराभव का होतो ? हे स्पष्ट होते कोणताही विचार हे समाजाच्या हितसंबंधाचे प्रस्थापित व्यवस्था शोषण जाळे असते ते प्रभुत्व जाती व धर्म मार्तंड यांनी तयार केलेले असते त्यात अडकल्याने विचाराची विधायकता विचाराची उपयुक्तता विचाराची प्रस्तुतता यांची तपासणी बहुतांश समाज करत नाही असे का होते ?या प्रश्नाचे उत्तर असे आहे की कोणत्याही विचाराच्या वाहक व्यक्ती समाजाला प्रिय वाटतात व्यक्तीची प्रियता ही व्यक्ती आसक्ती ची जात नेणिवेची गोष्ट असते वरकरणी पाहता व्यक्तीची प्रियता ही विचार प्रियता नसते त्या व्यक्तीने स्वीकारलेल्या विचार धारेचे लोक अनुयायी होऊ पाहतात पण विचाराचे पाई क होणे त्यांना महत्त्वाचे वाटत नाही पालखीचे भोई होणे ओझे वाहून नेणे असते पालखी उचलणे महत्त्वाचे असते पालखीतील व्यक्ती आणि विचार यांचे परिशीलन ओळखता इथे पालखी वाहने आणि भोई होणे हे परंपरागत मानसिकतेचे वर्तन आढळून येते विचार परिशीलन नाही विचार चिकित्सा नाही विचाराचे महत्त्व समजावून घेणे नाही विचाराची वर्तमानाला असलेली गरज तीही कळत नाही अशा अवस्थेतील बहुसंख्यांक त्याच्या काळातील समाज हा त्या विचाराचा मारेकरी असतो प्रथम तो त्या विचाराला शत्रू मानतो त्यातूनच विचार विरोध तयार होतो याचे पर्यावसन विचार नष्ट करण्यासाठी व्यक्ती नष्ट करा यामध्ये होते भारतीय हिंसा इतिहासात विचार नष्ट करण्यासाठी व्यक्ती आणि इतिहास नष्ट करा हे परंपरागत चालत आलेले व मानवी हिंसा इतिहास वर्तन याची चिकित्सा खूप होण्याची गरज आहे इथे हिंसेच्या समर्थनासाठी शत्रु भाव तयार केला जातो बदनामी केली जाते अनैतिक ठरवले जाते आणि नंतर त्या व्यक्तीच्या अपघाती जातीचे शस्त्र उपसून प्रथम त्या व्यक्तीला जातीय अहंगंड वन्यूनगंडाच्या चिरेबंदी व्यवस्थेत बंदिस्त केले जाते आणि त्या व्यक्तीची सार्वत्रिक निरपेक्ष भूमिका विचार स्वीकारा चे विस्तारित जाणारे क्षितिज अर्थातच वर्तुळ हे सीमित केले जाते त्या व्यक्तीकडे जात नाही देणे पहा अशा प्रत्यक्ष समाज वर्तनाच्या सूचना इथे सतत देणे चालू असते म्हणूनच ती व्यक्ती चिरेबंदी व्यवस्थेची एक घटक बनते आणि जाती विहीन निरपेक्ष असलेल्या कार्याला बदनाम केले जाते ते काम क्षीण होते हे विचाराचे आणि जातीचे एकमेकास प्रति रोधाचे चालले वर्तन दिसत नाही व्यक्तीच याच्या खलनायक असतात त्यामुळे विचाराचे महात्म्य विचाराचे प्राबल्य विचाराची उपयुक्तता विचाराची सार्वकालिक ता विचार स्वीकृतीचे साकारणारे विधायक परिणाम यांच्याबद्दल समाजामध्ये विचार होत नाही ही चिंतन होत नाही यांचे परिणाम व्यापक स्वरूपात अभ्यासाच्या पातळीवर दाखवून दिले जात नाहीत हे भारतीय समाजाच्या विचार पराभवाच्या अनेक कारणांपैकी ही काही कारणे ठरतात विचार साक्षरता आणि जातीय नेणिवेचा पराभव हे सतत करावयाचे काम आहे हे केले तरच नात्याच्या व्यक्ती आणि विचाराची नाती यातील फरक करणारा सजग समाज तयार होऊ शकतो जातीच्या नात्याच्या व्यक्तीच्या आसक्ती अक्षम्य गुन्हा वाटतो परंतु इथेच त्या व्यक्तीने मोठे करणे आणि जातीचे अहंगंड वाढवणे हे सुरू राहते व्यक्तीला प्राप्त झालेली अपघाती जात हे त्या व्यक्तीच्या हातात असत नाही परंतु जातीचा ऑक्टोपस हा मात्र निरपेक्ष कार्याच्या व्यक्तीला जात नेणिवेच्या हातांच्या आधारे सतत गिळंकृत करीत असतो
जात नेनी वेचे सोशल इंजिनिअरिंग सांभाळणारी इथे सजग लोक खूप आहेत त्यामुळेच या समाजातील ज्ञाती बांधवांना मोठे करणारा साहित्य समाजकारण आतला मोठा वर्ग स्वतच व्यग्र असलेला पाहायला मिळतो तो अशा कामात व्यस्त असतो अपघाताने असं काहीच व्यक्ती ऑक्टोपस पासून दूर राहतात पण त्यांच्या विचार मोठेपणाच्या परिघाला रोखले जाते हे पण करणारा एक विरोधी प्रभुत्व वादी माध्यम वादी वर्ग इथे अधिमान्यता वाटत राहत असतो आधी मान्यतेचे वाटप करणारा वर्ग कोण आहे त्याचे हेतू काय आहे त्याचे अर्थकारण काय आहे त्यातून त्यांना साध्य काय करावयाचे आहे विचार रोखा वयाचे आहेत विचारासाठी ऊर्जावान कार्यकर्त्यांची फळी वापरावयाची आहे की समाजाची विचार होडी दुसऱ्या दिशेला न्यावयाची आहे इतक्या गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये खोल जाणारा समाज अध्याप निर्माण झालेला नाही त्यामुळेच तर विचार दिशान्तर हे इथे सतत चालू आहे हे उदाहरण देऊन ही त्याची मांडणी करता येऊ शकते पण विचारा चे राजकारण आणि जातीय नेनिव चे शस्त्र हे इथे सतत सर्व कालखंडात कोणते परिणाम घडवून आणतात या अभ्यासा इतपतच सीमित हा विषय विश्लेषणासाठी निर्धारित करण्यात आला आहे
ज्या समाजामध्ये लेखन वाचन विचार निर्माण ही प्रक्रिया अतिशय गतिमंद आहे त्यामुळे हा समाज अधिमान्यता वाटणाऱ्या जात नेऊ ग्रस्त वर्गाकडे डोळे लावून सतत बसलेला पाहावयास मिळतो त्याची कृपा कटाक्ष ची अपेक्षा असते अधिमान्यता ही वैचारिक भिक्षा आहे हे ब्राह्मणी पुरोहित व्यवस्थेने तयार केलेले मान्यतेचे सापळे आहेत बहुतांश व्यक्ती आदी मान्यतेची भिक्षा घेण्यात आयुष्यातील अनमोल कार्यकाळ घालवतात यासच भारतात समाजकारण म्हटले जाते ही थोडी टीका होईल पण अंतरंगात पाहिले तर हे सर्व सभ्यतेचे कार्याचे विचाराचे कुटिल तेचे आत्मस्तुती चे राज कारण चालू असते अधिमान्य तिची भिक्षा देणारे हे भविष्यवेधी असतात त्यांना वर्तमानातील समाजाची गती कळालेले असते समाज गहिवर समाज संघर्ष राजकीय कुरघोड्या साहित्य संस्कृती क्षेत्रातील प्रतिसाद त्यासाठी आवश्यक असलेल्या मांडणीचा साहित्य परिपेक्ष याची गरज त्यांना कळाले असते त्याचे महत्त्व माहित असते म्हणून ते सतत विचार आणि कार्य यापेक्षा व्यक्ती आणि महात्म्य याला महत्त्व देतात व्यक्तीं आणि महात्म्य ही अधिमान्यता देणाऱ्या वर्गाची खुबी असते त्यांचा तो छंद बनलेला असतो गौरव करणे उदात्तीकरणाचे समीक्षा करणे त्या व्यक्तीच्या कार्याची वास्तव अवास्तव महती समाजात पोहोचविणे यासाठीचे सांस्कृतिक राजकारण हा वर्ग खूप गंभीरपणे करत असतो त्यातूनच त्यांच्या नाती बांधवांचे व्यक्ती महात्म्याचे मोठे जाळे तयार होते हेच जाळे म्हणजे प्रबोधन होय याचा जागर करणे म्हणजेच विचार जागर होय हे सतत कानी कपाळी ओरडून वृत्तपत्र व नियतकालिकांमधून सध्याच्या सोशल मीडिया वरून लादने म्हणजे विचार प्रबोधन आम्ही करीत आहोत हेच वर्तमानातील प्रबोधन युग होय असा स्वतः एक विचार समज ते प्रसुत करून देत असतात यातूनच व्यक्तीच्या गुणदोषांची चर्चा एका मर्यादित पातळीवर होण्याची गरज असते ती न होता व्यक्ती महात्म्य हा रोग सर्व कालखंडामध्ये समाजात जाती बांधव वाढवत असतात म्हणून विचार आणि कार्याची नाती ही श्रेष्ठ असतात धर्म आणि जातीच्या अपघाती नात्यांचे अनुबंध समाजाने स्वतःहून तोडणे अत्यावश्यक आहे हेच होत नाही म्हणूनच आधी मान्यता देणारा दीक्षा वाटणारा एक धूर्त चाणाक्ष वर्ग संस्कृतीच्या केंद्रस्थानी दबा धरुन अदृश्य पणे बसलेला असतो तो विचार साक्षर समाजाला दिसला पाहिजे दाखवून दिला पाहिजे तरच अधिमान्यता मिळवण्यासाठी संकीर्ण राजकारणात मोठ्या प्रमाणात गुंतलेले महाराष्ट्रातील जनअभिजन महाजन यांना वाचवता येऊ शकते
थोडक्यात विचार साक्षरता ही पुढे नेली पाहिजे जात नेणीव रोखली पाहिजे आधी मान्यतेची भिक्षा नाकारली पाहिजे व त्यांच्या सांस्कृतिक साहित्यिक राजकारणाला श्रेष्ठ न मानता त्यांनीच शिकवलेल्या उपेक्षा वादाचा आधार घेऊन दुर्लक्षित करणे हाच एक महत्त्वपूर्ण उपाय आहे सर्व क्षेत्रात हेतुतः आ जाती बांधवांच्या कडून रुजवण्यात येत असलेली बाबागिरी व दादागिरी ही पण समाजाला कळाली पाहिजे हे कर्तुत्वाचे महत्व नाही तर जात बंधूंनी वाढवलेले सांस्कृतिक राजकारण आहे ते साहित्याचे खरे अस्सल स्वरूप नाही साहित्य मूल्य विवेक पुढे नेतो साहित्य जात उदात्तीकरण करीत नाही इथे मराठीत मात्र याच्या उलट घडत आहे याचे जनजागर व्हायला हवे तरच साधी मान्यतेचे भिक्षेकरी कळू शकतील व जातीने नवेच हजार हाताचा ऑक्टोपस ओळखता येईल हे केले गेले तरच महाराष्ट्र देशी विचार प्रबोधनाचे पराभव हे आधी मान्य तेथे संस्कृतीत दुकानदार करू शकणार नाहीत याचे भान मराठी बंधू जनांच्या अंतकरणात येईल ही आशा वाटते
शिवाजी राऊत प्रेस
सातारा
16 मे 22 वेळ 07:31