इथे सनातन गावी. खूप उपेक्षा जीवी
वाचनानंद ही जीवनाची निरंतर छंदात्मक सवय व्हायला हवी ज्यांच्या जीवनामध्ये वाचनानंद चे महत्व प्रतीत झालेले असते त्यांचे जीवन ही ज्ञान समाधी दिशेने चाललेलि वाटचाल असते हि वाटचाल प्रत्येकाची व्हायलाच हवी. वाचन हे केवळ आनंदासाठी तर आहेच पण त्याचबरोबर त्या वाचक व्यक्ती जीवनाचे पूर्व ग्रह चुकीचे दृष्टिकोन व निष्कर्ष बदलण्यासाठी वाचन उपयुक्त होत राहते
वाचन हा ज्ञानविकास आहे विचार पद्धतींचा विकास आहे सम्यक दृष्टिकोनाचा कौशल्यात्मक अभिव्यक्तीचा विकास वाचनातून होत राहतो हे वाचनाचे आंतरिक संस्कार निरंतर चालू असतात वाचन ही केवळ रंजनाची गोष्ट नाही वाचन हे प्रतिक्रियावादी नाही वाचन हे आकलन आहे वाचन हे समृद्ध दृष्टिकोनाचे प्रयत्नपूर्वक स्वतः केलेले ज्ञानसाधनेचे प्रयत्न आहेत वाचन हे निरपेक्ष वास्तव असायला हवे व्यक्ती जीवन आणि वाचन आवड आणि वाचन सवड आणि वाचन ज्ञानाची उपयुक्तता आणि वाचनाची गरज हे सगळे वाचनाशी संलग्न असलेले अनेक घटक वाचकाला त्या त्या घटनांनी प्रसंगी पूर्णतः प्रतीत होतातच असे नाही तरीही वाचन ही प्रत्येक व्यक्ती जीवनाची सतत आंतरिक विकसित करणारी ज्ञान प्रक्रिया आहे वाचनाला विषयाचे भेद असता कामा नयेत विषयनिहाय वाचन ही समाज जीवनाची व्यापक गरजेची गोष्ट असते पण तरीही वाचनाची भिन्नता हे समृद्ध वाचनाचे क्षितिज आहे वाचनाला भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाचा अवकाश असतो तो आपणाला पकडता येणे हे व्यक्तींच्या आकलन वेगावर अवलंबून असते या सगळ्या हेतूसाठी मराठी वाचन विश्वात वाचनाचा सूक्ष्म विचार अभावाने होत असल्याचे आढळून येते वाचन ही चर्चेची प्रत्येकाला समृद्ध करत जाणारी अमूर्त प्रक्रिया आहे म्हणून वाचनाला अनन्यसाधारण महत्त्व देणारा जीवनाच्या हरेकक्षत्रातला वाचक हा मौलिक घटक आहे तो ज्ञानसाधक आहे तो ज्ञान निर्माता आहे तो सृजनाचा उद्याचा निर्माता आहे म्हणून वाचनाला अपेक्षा आणि उपेक्षा यांनी जेव्हा ग्रासलेले असते तेव्हा गांभीर्याने घेण्याची गरज असते मराठी भाषा विश्वात साहित्याचे वाचन हेच मुख्य वाचन मानण्याची चूक अनेक जण करीत असतात ज्ञानाची असंख्य क्षेत्रे समस्येचे असंख्य कारणे यासाठी वाचन करणे हा ज्ञानाचा सूक्ष्म प्राप्ती घटक व्हायला हवा तो आता होत असल्याचेही काही अंश आढळून येते आणि म्हणूनच वाचना ची छंदात्मक आवड हे जीवनात सहज आनंदी होण्याचे साधन आहे हे खूप सर्व दूर महत्त्व पटायला हवे ते पटवून द्यायला हवे
वाचन आणि अपेक्षा व वाचनाची हेतूतहा केलेली उपेक्षा या तील फरक समजावून घेणारा वाचक बंधू वर्ग मोठ्या संख्येने तयार होण्याची गरज आहे वाचन आणि अपेक्षा हे असंख्य पातळीवर प्रतिसादासाठी अत्यावश्यक असते नवा विचार नवा दृष्टिकोन नवे निष्कर्ष नवा तर्क नवे अनुमान ज्या लेखनामध्ये मांडलेले आहे अशा लेखनाची उपेक्षा वाचक विश्वामध्ये होता कामा नये हे वाचक विश्वाच्या निकोप विकासासाठी अत्यंत आवश्यक असे वाचक वर्तन व्हायला हवे आज मराठी भाषेमध्ये या दृष्टिकोनातून वाचनाला प्रतिसादात्मक स्वीकारणे त्याची निकोप चर्चा करणे याची अपेक्षा आणि गरज सतत असते आणि आहे परंतु वाचनाच्या विषय व दृष्टिकोनाला पूर्वग्रहांनी ग्रासून स्वतः ठेवल्या असल्यामुळे आपण मौलिक विषय आणि घटक हे जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवून वाचन टाळतो याची कारणे काय याची कारणे वेळेचा अभाव लेखनकर्त्याच्या बद्दलचे पूर्वग्रहाचे दृष्टिकोन हे आहेत लेखन करणारा लेखक हा एका प्रतिमेवर मध्ये अडकलेला असतो किंबहुना वाचकांनी त्या लेखकाबद्दल तयार केलेल्या चौकटी असतात ती त्याची प्रतिमा असते त्यामुळे कोणत्याही लेखन कर्त्याचे लेखन हे न वाचता निरपेक्ष दृष्टिकोनातून त्याच आकलन करून न घेता असे वाचन उपेक्षित ठेवले जाते असे विचार अशा साहित्यकृती अशीच वैचारिक वांग्मय कृती असे चिंतन हे हेतूतहा दूर ठेवणारा उपेक्षावादीवाचक हा मराठी भाषेमधील प्रदूषित घटक आहे तो उपेक्षा त्या विषय तील घटकाच्या वाचनाचीच करत नाही तर तो ज्ञान दृष्टिकोना पासून स्वतःला हेतूतहा दूर ठेवतो आणि पूर्वग्रहाच्या आकस गैरसमज आणि तुच्छता याच स्वतःच्या अहंकार वर्तनाने उपेक्षेने मौलिक वाचन नाकारतो तो स्वकीयांचे प्रियजनांचे आपल्या आग्रहाने अस्मितांचा गौरव करणाऱ्या लेखकांचे वाचन करतो यातूनच वाचन विश्वामध्ये उपेक्षेचा अदृश्य तुच्छतावाद नकारवाद हा सभोवताली वाढत असतो आज मराठी वांग्मय विश्वात वाचन विश्वातील उपेक्षा ही विपरीत परिणाम घडवत आहे परिचितांचे प्रियजनांचे मित्रांचे स्व विचारधारेच्या समर्थकांचे वाचन तेवढे मौलिक आहे असे मानून त्याचे उदात्तीकरण करणे त्याचा गौरव करणे त्याची महाचर्चा करणे हे घडवले जात आहे हेतूताव वाचन राजकारण केले जात आहे त्यामुळे मराठी भाषेत निरपेक्ष वाचन विश्वाची संस्कृती अद्याप तयार झालेली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते. ज्ञानाला निरपेक्षक असते सृजनाच्या नवप्रेरणांच्या मध्ये सनातनी आग्रहांनची चिकित्स असते त्यामुळे असे वाचन हेतूचा दूर ठेवले जाते हा वाचन तुच्छतावाद हा संकुचित वाद निर्माण करतो विचार दृष्टिकोन विकासाच्या आड येणारी ही प्रवृत्ती कायम वाढत राहते आणि त्यातूनच नवनवेषक विचार प्रसार होत नाही हे मराठी वाचन विश्वाचे आजचे वास्तव आहे म्हणून मराठी वाचन विश्वाला उपेक्षावादाच्या पासून दूर ठेवण्यासाठी व वाचन राजकारणाच्या कुटील व्यक्तिग्वेषापासून वाचवण्याची गरज आहे वाचन हे अपेक्षित प्रतिसादाची अपेक्षा असते कोणत्याही व्यक्तीच्या लेखनाचे केलेले वाचन हे त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व लगेच मान्य केले म्हणून वाचकाला हिनता लीनता येत नसते किंबहुना कमीपणा ही प्राप्त होत नसतो आपण कोणा व्यक्तीचे लेखन वाचतो म्हणून आपण कमी ठरत नसतो पण तरीही हे सर्व आंतरिक दोष बाळगून आप्त स्वकियांचे स्व विचारधारांचे लेखन फक्त वाचण्याचा अहंकार मराठी वाचन विश्वात पदोपदी पहावयास मिळतो तेव्हा निकोप मराठी वाचन विश्व याचे पर्यावरण तयार होण्याच्या पासून आपण दूर आहोत याची खंत खूप वाटून राहते व्यक्तीचा उपेक्ष वाद व्यक्तीचा तुच्छता वाद हे वाचकांचे दोष हे ज्ञान विश्वाच्या विकासाच्या आड येतात याची जाणीव मात्र वाचक बाळगत नाहीत आणि त्यातूनच एक संकुचित वाचन विश्व समर्थकांच्या गौरवासाठीचे चालू असल्याचे आढळून येते हे होऊ द्यायचे नसेल तर व्यक्ति तुच्छता व द्वेष टाळून त्या व्यक्तीने मांडलेल्या ज्ञान विषयाचे महत्त्व गरज आणि नवनीतता म्हणून वाचन करायला हवे अन्यथा सार्वजनिक जीवनातला नेनिवेतील तुच्छता वाद
हा आपल्या ज्ञान विश्वाचे फार मोठे नुकसान करतो याची जाणीव व्हायला हवी याचे जाणीवपूर्वक निरसन व्हायला हवे असे सतत वाटून राहते
समाज माध्यमाच्या विस्फोटकारी लेखनामध्ये आक्रमकता आहे वैविध्य आहे नवीनत आहे वेदकता आहे खूप नवीन दृष्टिकोन आहेत खूप वेगळ्या प्रकारचा तर काय इतिहासाच्या जुन्या संदर्भांचा नव्याने लावलेला अर्थ असतो या अंगाने खूप लेखन समृद्धपणे पुढे येत आहे पण तरीही या समृद्ध लेखनाला कोण व्यक्ती लिहिते आहे हे तपासून वाचनापासून प्रतिसाद देण्यापासून दूर ठेवण्याचे नकळत असे कुटील राजकारण करणारा आधी मान्यतेचा वंशवादी अहंकार हा खूप मोठ्या प्रमाणात विखारी टीका व्यक्ती द्वेष वी वाढ तो आहे
उपेक्षा ही व्यक्तीची तात्कालीक होते पण त्या व्यक्तीने दाखवलेला ज्ञानदृष्टीकोन हा समाज वर्तनाची गरज असते तो ज्ञान दृष्टिकोनच त्यामुळे आपण गमावतो हे फार मोठे सामाजिक नुकसान असते हे ज्ञानाचे वंचित पण असते हे समजावून घेण्याची गरज आहे उपेक्षा जेव्हा ज्ञान साधने कमी होती तेव्हा शक्य होते पण ज्ञानाच्या विस्फोटाच्या वर्तमान काळात व व्यक्ती स्वतंत्रतेच्या अविष्कार स्वातंत्र्याच्या महत्त्वपूर्ण कालखंडात हा उपेक्षवाद टिकणार नाही तो टिकत नाही हे तरी समजावून घेऊन ने निव वादी व अभिजनवादी यांनी हि स्व तची घोर फसवणूक समजावून घेण्याची गरज आहे. इथे वाचन राजकारणाचा आणि उपेक्षावादाचा अंतरंग स्पष्ट केला आहे वाचन राजकारण आणि उपेक्षा वाद हे मराठीतील अभिजनवाद्यांनी आदी मान्यतेचा अधिकार स्वतःकडे असलेल्या अहंकारी विचार जीवी व्यक्तींनी पसरवलेला हा प्रदूषण घटक ज्ञान विश्वातून नाही साकारण्यासाठी निकोप ज्ञान पर्यावरणाचे निर्माण कार्य हाती घेणे हे प्रत्येकाला करावे लागणारे मराठी भाषेसाठीचे महत्त्वपूर्ण कार्य होय
शिवाजी राऊत सातारा
प्रेस एक ऑगस्ट 2022 वेळ 11:30