महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुप्रीम कोर्टात!
उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष महिनाभरापासून सुरु आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. शिवसेना विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात देशातील उच्च वकील लढत आहेत. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसह एकूण 4 याचिकांवर आज सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांनी शिवसेनेकडून युक्तिवाद सुरु केला तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि निरज कौल यांनी युक्तिवाद केला.
माननीय न्यायाधीश यांनी आज दोन्ही पक्षांचे म्हणने ऐकून घेतले व उद्या यावर सविस्तर चर्चा होईल.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद-
पक्षांतर बंदी कायद्यानुसार, या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल किंवा त्यांनी नवीन पक्ष बनवावा. सरकार हवं असेल तर नवा पक्ष किंवा विलीनीकरण हाच पर्याय असू शकतो असं सिब्बल यांनी म्हंटल. शिंदे गट स्वतःला मूळ पक्ष सांगू शकत नाही. तसेच १० व्या सूचनेनुसार मूळ राजकीय पक्ष म्हणजे काय हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टात वाचून दाखवले. यावेळी त्यांनी कर्नाटकाचा दाखला देत पक्षाचा विप मान्य केला नाही तर आमदार अपात्र कसे होऊ शकतात याचेही वाचन त्यांनी कोर्टात केलं.
बंडखोरांनी मुळ पक्षाचा व्हिप डावलला असे कपील सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले आहे. एकनाथ शिंदे गट हा मुळ गट आहे का? की नाही हे लवकरच कळेल. परंतु या न्यायालयीन प्रक्रियेमुळे राज्यातील मंत्री मंडळाचा विस्तार रखडला आहे. आणि यामुळे अजित दादा पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे. तर दुसरीकडे युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी उपहासात्मक पध्दतीने एकनाथ शिंदे सरकारचे दोन जनाचे जम्बो मंत्री मंडळ लवकरच कोसळेल अशी भविष्यवाणी व्यक्त केली आहे.
शिवसेना पक्ष व शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाण कोणाच्या हाती जाईल हे लवकरच स्पष्ट होईल. या न्यायालयीन लढाईतच शिवसेनेचे (दोन्ही गटांचे)भवितव्य अवलंबून आहे