कागल एक्साईजचा गोव्यातील दोन कारखान्यांवर सर्जिकल स्ट्राईक; १ कोटी ३२ लाखांचा मुद्देमाल सील
महाराष्ट्राचे बनावट लेबल लावून देशी दारूची निर्मिती; आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) आंतरराज्य बनावट दारू तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. कागल एक्साईज पथकाने थेट गोवा राज्यात जाऊन बनावट मद्य तयार करणाऱ्या दोन कारखान्यांवर छापे टाकले. या कारवाईत सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल सील करण्यात आला असून, बनावट मद्याचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.

गोव्यातून चालत होते महाराष्ट्राचे रॅकेट
गोवा राज्यात महाराष्ट्रातील ‘संत्रा’ या देशी दारूची बनावट पद्धतीने निर्मिती केली जात असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कागल एक्साईजचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान, महाराष्ट्रासाठी बनावट लेबलिंग आणि पॅकेजिंग करणाऱ्या ‘कॅनस’ आणि ‘विजया’ या दोन कंपन्यांचे नाव समोर आले. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या विशेष परवानगीने या दोन्ही कंपन्यांवर छापा टाकून त्या सील करण्यात आल्या आहेत.

जप्त करण्यात आलेले साहित्य
या धडक कारवाईत केवळ दारूच नव्हे, तर निर्मितीसाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे:
- बनावट लेबल, बुचे (कॅप्स) आणि पॅकिंग बॉक्स.
- बुचे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा ‘कन्व्हेयर बेल्ट’.
- गुन्ह्याशी संबंधित अन्य तांत्रिक यंत्रसामग्री.
- प्रमुख: निरीक्षक शंकर आंबेरकर, निरीक्षक प्रमोद खरात.
- सहकारी: सब-इन्स्पेक्टर अजितकुमार नायकुडे, रमेश चंदुरे, दिवाकर वायदंडे, सचिन काळेल, दिनकर गवळी, लक्ष्मण येडगे आणि संदीप जानकर.


