शिक्षकाच्या मडक्यातील पाणी पिणे जीवावर बेतले. अशा शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या.
भिम ब्रिगेड संघटना कोल्हापूर जिल्हा च्या वतीने कोल्हापूर उप जिल्हाधिकारी यांना निवेदन..
गुडाळ वार्ताहर/ संभाजी कांबळे
शिक्षकाच्या मडक्यातील पाणी पिणे जीवावर बेतले .. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही आपल्याच देशातील विशिष्ट समाजातून येणाऱ्या नागरिकांना खरे स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे दिसून येते. ब्रिटिशाच्या गुलामगिरी पासून तर स्वतंत्र झाले परंतु जाततिपातीच्या गुलामीत अजून ही जगातच आहोत.याचे ताजे उदाहरण म्हणजे राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात घडले आहे. एका शाळेत दलित विद्याथ्याने खाजगी शाळेच्या संचालकाच्या मडक्यातील पाणी प्यायले. या कारणावरून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. शिक्षकाने त्याला इतके मारले की विद्या विद्यार्याच्या कानाची नस फाटली एवढेच नव्हे तर या मारहाणीमुळे त्याला जीव देखील गमवावा लागला. याप्रकरणी मुलाने शाळेतील पाण्याच्या भांड्याला हात लावल्याचा आरोप मुळे त्या शिक्षकाने त्याला जबर मारहाण केली .त्यामुळे मुलांच्या कानाची नस फुटली होती गेल्या 25 दिवसा पासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र अखेर त्याचा मृत्यू झाला .अश्या शिक्षकाला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे तसेच भिम ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संघटना कोल्हापूर जिल्हा च्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो
कोल्हापूर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले .त्यावेळी भिम ब्रिगेड संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.सचिन कदम , जिल्हा उपाध्यक्ष मा. प्रदिप कांबळे, दिपक कांबळे , दत्ता कांबळे उपस्थित होते.
