आयर्न मॅन किताब विजेते अतुल पाटील यांचा सत्कार संपन्न
आयर्न मॅन किताब मिळवल्याबद्दल सत्कार करताना अॅडव्होकेट धनंजय पठाडे सोबत अमोल कुरणे, अक्षय साळवे आदी.
कोल्हापुरातील विविध मंडळाच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क एक्साईज कोल्हापूर विभागाचे अधिकारी अतुल पाटील यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयर्न मॅन किताब मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
अतुल पाटील यांनी आयर्न मॅन चा किताब मिळवून कोल्हापूरच्या वैभवात भर घातली आहे असे मनोगत अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी एक्साईजचे सीनीअर इन्स्पेक्टर नंदकुमार देवणे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी परिवर्तन चे अमोल कुरणे, क्रांतीगुरु साळवे प्रतिष्ठानचे अक्षय साळवे, फिरोज सतारमेकर, जुना बुधवार तालीम मंडळाचे गणेश मोहिते, वाघाची तालीम मंडळाचे दिलीप कदम, ज्ञानेश्वर मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.