चुकीच्या अफ़वांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. ; स्माईल हेल्थ केअर चे संस्थापक अध्यक्ष शिवानंद कुंभार यांचे आवाहन

चुकीच्या अफ़वांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. ; स्माईल हेल्थ केअर चे संस्थापक अध्यक्ष शिवानंद कुंभार यांचे आवाहन

चुकीच्या अफ़वांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. असे ठाम मत स्माईल हेल्थ केअर चे संस्थापक अध्यक्ष शिवानंद कुंभार यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली. बेनाडी मध्ये गेल्या नऊ दहा दिवसापासून महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील एका एनजीओ कडून कमी खर्चात औषधी उपचाराची फसवणूक सुरू आहे यातून या एनजीओने लाखो रुपयाची लुट केली आहे. अशी चुकीची बातमी सोशल मीडिया द्वारे प्रसारित करण्यात आली आहे. प्रतित्युरामध्ये या सर्व आरोपांचे खंडन करीत स्माईल हेल्थ केअर चे संस्थापक अध्यक्ष शिवानंद कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की,कोणतीही शहानिशा करण्या अगोदरच ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे.फसवणूक म्हणजे एखाद्या प्रॉडक्ट चे पैसे घेतले आहेत व ते प्रॉडक्ट जनतेला दिलेले नाही असे होते.लुट म्हणजे एका प्रॉडक्ट ची किंमत मूळ किंमती पेक्षा जास्त पैसे आमच्या संस्थेने घेतले आहेत असे होते. अशी चुकीची बातमी आमच्या संस्थेच्या नावाने कोणतीही शहानिशा करण्या अगोदरच चुकीची बातमी पसरविण्यात आली आहे. याचीच मला व आमच्या संस्थेला खंत आहे. आमची संस्था ही बऱ्याच वर्षांपासून आयुर्वेदामध्ये कार्यरत आहे.आमच्या संस्थेचा उद्येश म्हणजे गरीब जनतेपर्यंत न्यूट्रिशनल फूड सप्लीमेंट व आयुर्वेदिक औषध उपचार पोहचवावा. व सर्व सामान्य जनतेचा कमी खर्चामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढावी व रोग निवारण व्हावा इतक्याच आमचे संस्थेचे उद्देश आहे. त्यासाठी लागणारे सर्व कागदोपत्री लायसेन्स आमच्या संस्थेकडे आहेत.ज्यांना कोणालाही आमच्या संस्थेची कागदपत्रांची पडताळणी करावयाची असल्यास 9242121008 या मोबाईल क्रमांकाशी सम्पर्क साधावा ही नम्र विनंती. कोरोना काळामध्ये ही आमच्या संस्थेने सर्व सामान्य जनतेचा मोफत उपचार करून प्रामाणिकपणा दर्शवला आहे.व यापुढेही सामान्य जनतेपर्यंत न्यूट्रिशनल फूड सप्लीमेंट व आयुर्वेदिक औषध उपचार पोहोचविन्याचे काम आम्ही आमच्या संस्थे मार्फत करणार आहोत. तरी जनतेने कोणाच्याही सांगण्याला बळी न पडता आमच्या संस्थेवर पूर्ण विश्वास ठेवावा. असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *