मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा..
:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राधानगरी तालुक्याचे वतीने जाहीर निषेध!
गुडाळ वार्ताहर /संभाजी कांबळे
महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांच्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राधानगरी च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील ही आमची दैवत असून आणि त्यांच्याबद्दल एका जबाबदार मंत्र्याने अपमानास्पद बोलणे हे अशोभनीय आहे तसेच मंत्र्यांना भीक आणि लोक वर्गणी यातील फरक समजत नाही का चंद्रकांत पाटील यांनी संताप जनक वक्तव्याने तमाम नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत तरी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिक पक्षाच्या वतीने तहसीलदार राधानगरी व पोलीस निरीक्षक राधानगरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी रिपब्लिक पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे (सरवडेकर) व तालुका अध्यक्ष प्रकाश कांबळे (शिरसेकर) जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कांबळे (पनोरीकर) बाळासो कांबळे,, शिवाजी कांबळे (कुडित्रीकर)युवा आघाडी अध्यक्ष संभाजी कांबळे(गुडाळकर) आधी पक्षाचे कार्यकर्ते हजर होते यावेळी सदरची निवेदन पोलीस निरीक्षक यादव व तहसीलदार कार्यालयाकडील उपलेखापाल अंकुश रानमाळे यांना देण्यात आले

