शांतारामबापूंना अभिवादन आणि जे.एफ. स्मृतीअंकाचे प्रकाशन
इचलकरंजी ता.समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस, थोर विचारवंत स्वातंत्र्यसैनिक कालवश आचार्य शांताराम गरूड हे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या प्रबोधन चळवळीतील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांवर आधारित राजकारण, समाजकारण, अर्थकारण यासह सर्व व्यवहार असले पाहिजेत हे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते.त्या विचारांच्या आग्रहाची आज नितांत गरज आहे. तो विचार घेऊन नेटाने व संघटीतपणे पुढे जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते आचार्य शांताराम गरुड यांच्या ९६ व्या जन्मदिनी त्यांना अभिवादन करताना बोलत होते. यावेळी वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे अध्यक्ष पांडुरंग पीसे यांच्या हस्ते आचार्य शांताराम गरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या” प्रबोधनाची बांधिलकी जपणारे थोर अर्थतज्ञ प्रा. डॉ.जे.एफ.पाटील स्मृतीअंकाचे “प्रकाशन गोविंद निवृत्ती कांबळे, राहुल राजशेखर सोरेगाव ,धोंडीराम राजाराम शिंगारे, गजानन नारायण मांजरेकर या वाचकांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी ,धीरज पाटील, विशाल जाधव उपस्थित होते.