पंचमहाभूतम् लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरती ने प्रांरभ – सर्वानी सहभागी व्हावे – परमपूज्य काडसिद्ध स्वामीजीचे आहवान – सातारा – गोजेगाव मधील तुतारी पथकासह अनेक आकर्षणे कोल्हापूर – विविध राज्यासह परदेशातील विविध मान्यवर प्रतिनिधी सहभागी असणाऱ्या सिद्धगिरी कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ शिवजयंती दिन रविवारी भव्य मिवणुकीसह पंचगंगा नदी येथे सामुदायिक आरतीने होत असून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे हितगुनपर आहवान परमपूज्य काडसिध्देश्वर स्वामीजी यांनी केलेले आहे . शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदानामधून या या मिरणुकीच्या शुभारंभ होणार असून त्यामध्ये त्यातून बिनखांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड पापाची तिकटी मार्गे गंगावेश पंचगंगा नदी या ठिकाणी ही मिरवणूक विसर्जित होईल त्या वेळी त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सह पालकमंत्री दीपक केसरकर ,उद्योगमंत्री उदय सामंत तसेच माजी आमदार राजेश शिरसागर यांच्या हस्ते आरती होणार आहे . विविध चौदा राज्यातील पारंपारिक लोकवाद्यासह कलाकारांचा सहभाग आणि त्यांचे सादरीकरण तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवना आधारित चित्र त्यांचे पर्यावरण विषयक विचार यांचे प्रदर्शन हे या निवडणुकीचे मोठे वैशिष्ट्य देणार आहे यामध्ये सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील 11 जणांचे घडशी – गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादन पथक हे मुख्य आकर्षण असणार आहे तरी या सर्वांचा नागरिकांनी स्वतःहून सहभागा सह लाभ घ्यावा आणि येत्या 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कणेरी मध्ये येथे होणाऱ्या या पंचमहाभूत नको उत्सव सोहळ्याची सहभागी व्हावे त्यासाठी केमटीची मोफत प्रवास सुविधाही उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक यांच्यावतीने करण्यात आले .
Posted inकोल्हापूर
पंचमहाभूतम् लोकमहोत्सवाचा शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकी सह पंचगंगा नदी महाआरती ने प्रांरभ – सर्वानी सहभागी व्हावे – परमपूज्य काडसिद्ध स्वामीजीचे आहवान
