- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जागा खरेदी भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी या मागणीसाठी खोतवाडी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणाचा इशारा
खोतवाडी प्रतिनिधी :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जागा खरेदी भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशीच्या मागणीसाठी खोतवाडी ग्रामपंचायत समोर अमरण उपोषणाचा करण्याचा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य अजित सोळशे यांनी दिला आहे
ग्रामपंचायत खोतवाडी तालुका हातकणंगले येथील तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी दि.२४/११/२०२२. रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधण्याकरिता गावातीलच अमर शिवाजी गोसावी यांच्या मालकीचे गट नं १५ एकूण क्षेत्र हे ०.९३.०० आर प्लॉट नं ३० चे क्षेत्र १३९.४० चौ.मी म्हणजेच क्षेत्र १५०० चौ. फूट ची बिगरशेती खुली जागा १५ लाख रु. ने खरेदी केली आहे. खरेदीची हि रक्कम बाजारभावानुसार नसून वाढीव किंमतीने दाखवून लाखो रु. चा भ्रष्टाचार केला आहे. याचे उदाहरण म्हणजेच गावातील त्याच गट नं १५ मधील अमर गोसावी यांच्याच मालकीची क्षेत्र १८०० चौ फुट चा भूखंड शाबुद्दीन मणेर यांनी ७ लाख १५ हजार रु ला दि १३/०४/२०२२ रोजी खरेदी घेतली आहे. दोन्ही जागेच्या खरेदीचे दस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासनाला दिलेल्या अर्जासोबत अजित सोळशे यांनी जोडले आहे. एकाच गट नं मधील एकाच मालकाची जमिन असताना १८०० चौ फूट हि जागा ७ लाख १५ हजार ला खरेदी होते तर दुसरी जागा ग्रामपंचायत ने घेतलेली १५०० चौ.फूट हि जागा १५ लाख रु ने खरेदी होते यामध्ये अंदाजे ८ लाख ७५ हजार रु वाढीव किंमतीने खरेदी केली आहे. यामध्ये शासनाची दिशाभूल करून सरळ सरळ ग्रामपंचायतीने आर्थिक गैर व्यवहारआहे करून भ्रष्टाचार केला आहे. तरी साम्भंधित ग्रामसेवक श्री अनंत गडदे व तात्कालीन सरपंच संजय चोपडे यांच्यावर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा व वाढीव किंमतीचा फरक वसूल करण्यात यावा या मागणीसाठी लोकशाही मार्गाने सोमवार दि २०/०३/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहेत अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री ,ग्रामविकास मंत्री ,पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर ,गटविकास अधिकारी हातकलंगले यांना पाठवले आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास यास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. असेही निवेदनात नमूद केले आहे