सिर्सी गावात जागतिक वन दिन करण्यात आला साजरा
वनसंरक्षण व वन्यजीव बचाव मोहीम संदर्भात माहिती देत जनजागृती
वन, वन्यजीव वाचवा देश वाचवा – आर.एफ.ओ. खोडनकर
नागपूर प्रतिनिधी// नंददत डेकाटे
वन विकास महामंडळ वन प्रकल्प विभाग नागपूर अंतर्गत दक्षिण उमरेड कार्यकेंद्र मध्ये जागतिक वन दिन या निमित्त शिरसी गावामध्ये माननीय सरपंच तथा उपसरपंच यांच्या उपस्थितीत तथा गावकरी आणि विद्यार्थी गण यांना वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जंगलाचे महत्त्व तसेच सध्याचा मोसम असलेला आगीचा सीजन यापासून जंगलाला कसे वाचवावे याबाबत संबोधित केले तसेच जंगलाला आग लागल्यामुळे जंगलाचा होणारा नुकसान तसेच वन्यजीव वन्य प्राणी यावर होणारे आणि त्याच्यावर मानवावर पडणारा विपरीत परिणाम याबाबत सविस्तर संभाषण करण्यात आले जंगलात लागलेल्या आगेमुळे सरपटणारे प्राणी किडे माकोडे पक्षी यांचे घरटे तसेच अंडी यांना होणारे आगीपासून नुकसान समजावून देण्यात आले. त्यामुळे जंगलाला आगी पासून वाचविल्यास जंगलातून मिळणारे सरपण गुरांना मिळणारे गवत चारा असे विविध प्रकारे होणारा फायदा मानवाला जंगलाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वन कर्मचारी यांनी उपस्थित राहून उपस्थित त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.