दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता क्षेत्रिय भेटीचे व सहलीचे आयोजन
रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी ✍️
पंचायत समिती भिवापूर येथून तालुक्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता क्षेत्रिय भेटीचे व सहलीचे आयोजन करण्यात आले होते सदर क्षेत्रीय भेट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरेड येथे देण्यात आली तदनंतर करांडला येथील टायगर रिसॉर्ट येथील वॉटर एडवेंचर पार्क मध्ये विद्यार्थ्यांची सहल नेण्यात आली सदर सहलीत 70 विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकानि सहभागी होऊन सहलीचा आनंद घेतला.
सदर क्षेत्रीय भेट व सहलीस माननीय गटशिक्षण अधिकारी विजय कोकोडे साहेब यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या तसेच श्रीमती राजश्री भावे जिल्हा समन्वयक समावेशीत शिक्षण डायट नागपूर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिव्यांग मुलांचे मनोबल वाढवले तालुक्यात शाळा स्तरावर 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांकरिता प्रत्यक्ष अनुभव व समज विकास करण्याच्या दृष्टीने सहलीचे आयोजक करण्यात आले होते. दिव्यांग मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला आहे अशी माहिती समावेशित तज्ञ बागडे सर यांनी भेटी दरम्यान दिली या उपक्रमास मोलाचे सहकार्य दिलीप शहारे शिक्षण विस्तार अधिकारी तथा पोषण आहार अधीक्षक , ऋग्वेद भांडारकर विस्तार अधिकारी तसेच गट साधन केंद्र पंचायत समिती भिवापूर संसाधन शिक्षक अतुल कन्हेरे ,निलेश मुळे , विकास वानखेडे , सविता डोबले ,राधा ताकसाडे , गजानन ठाकरे, हितेश साखरकर,मिलिंद मेश्राम,संजय खोब्रागडे, मेघा गुरनुले रीता नेवारे सुषमा काटोले किरण परेकार , दशरथ वासनिक यांनी प्रामुख्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना सहली दरम्यान मदत केली अशाप्रकारे सहलीची सांगता सायंकाळी 5 वाजता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.