मगदूम अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागातील ११ विद्यार्थ्यांची निवड
जयसिंगपूर येथील डॉ. जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन विभागातील अकरा विद्यार्थ्यांची निवड
व्हर्चूओसा कंपनीमध्ये झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी केले.
व्हर्चसो हि इलेक्ट्रिकल अँड ऍटोमेशन प्रकल्प सेवा डोमिनमध्ये कौशल्य आणि ट्रॅक रेकॉर्डसह भागीदार म्हणून कार्य करणारी कंपनी आहे . निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभिषेक पवार, यश जठार, भाग्यश्री सोनावळे, निकिता सुतार, नम्रता शेट्टी, गायत्री पाटील, ओमकार वैद्य, मोहिनी चव्हाण, स्नेहा काटे,प्रसाद बाबर, सुधीर साळे यांची निवड लेखी व तोंडी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी. माळगे व ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा. अक्षय सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.
Posted inकोल्हापूर
मगदूम अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागातील ११ विद्यार्थ्यांची निवड
