रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आशा महीलांची जोरदार निदर्शने!
आशा महिलाना मोबाईल आणि रीचार्ज खर्च न देता ऑनलाईन काम PMJAY चे कार्ड काढणे, आभा कार्ड काढणे व इ संजीवनी चे काम केले जाणार नाही असे निवेदन रत्नागरी जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ आठले यांना दिले .तसेच असेही महिलांनी सांगितले की जर अधिकाऱ्यांनी ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास अशा अधिकाऱ्यांचावर मागासवर्गीय आशा महिला अट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करतील असा इशारा देण्यात आला.
सद्या राज्यांतील सत्तर हजार आशा महिलाना दरमहा पाच हजार रुपये फिक्स मानधन देण्यात येते. परंतू महाराष्ट्र शासनाने हॉस्पिटल मध्ये काम करणार्या महिलाना दरमहा पंधरा हजार रुपयांचे किमान वेतन कायदा लागू केला आहे. पण राज्य सरकार स्वतःचाच कायदा स्वतःला लागू करण्यास तयार नाही.असे जिल्हा परिषद समोर झालेल्या सभेमध्ये बोलताना कॉ सुमन पुजारी यांनी सांगितले.
कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की आशा व गटप्रवर्तक महिलाना शासकिय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा असे होईपर्यंत सर्व कामगारांना दरमहा सव्वीस हजार रुपये पगार मिळावा. अशी मागणी केली.
या आंदोलनात जिल्हयातील आशा नेत्या विजया शिंदे. विद्या भालेकर अरुणा चिंचविलकर स्वानंदी गावडे अंकिता शिंदे स्नेहल कांबळे स्वाती वरवडेकर पूनम याष्टे मधुरा साळवी नई मा धामस्कर मिथिला मोरे वृंदा देवरुखकर इत्यादींनी आंदोलनामध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अधिक माहितीसाठी सोबत निवेदन दिले आहे.
आपला विश्वासू
कॉ शंकर पुजारी
अध्यक्ष
महाराष्ट्र आशा गट प्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना Aituc
Posted inरत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा परिषदेवर आशा महीलांची जोरदार निदर्शने!
