सोमवार २६ फेब्रुवारी कलेक्टर ऑफिससमोर धरणे
शेतकरी आंदोलनात दोन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू केंद्र शासनाचे निष्काळजीपणामुळे – निषेधार्थ 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – शिवाजीराव परुळेकर
शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत (एम एस पी)
स्वामीनाथन आयोगानुसार देऊन शासनाने 23 प्रकारचे शेतीमाल खरेदी करावेत, शेतकऱ्यांना पेन्शन द्यावी, 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसारच शेतकऱ्यांचे भूसंपादन करावे या व अन्य दहा न्याय मागण्यासाठी सुमारे शेतकरी संघटना व पंजाब हरियाणाचे शेतकरी आंदोलनासाठी गेला आठ दिवसापासून दिल्लीकडे ट्रॅक्टर जेसीबी गाड्या व सहा महिन्याची शिदोरी घेऊन दिल्लीकडे निघाले आहेत. त्यांच्या मार्गात विविध प्रकारच्या अडथळे निर्माण करून प्रसंगी अश्रुधुराचा वापर करून शेतकऱ्यांचे न्याय मागण्यांचे शांततामय आंदोलन केंद्र शासन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे त्यातच दोन तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ही निषेधार्ह बाब असून या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी समाजवादी पार्टी, जनता नागरी निवारा संघटना व माजी सैनिक कल्याण संघटनेमार्फत सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे राज्यसचिव व किसान संघटन राज्य अध्यक्ष शिवाजीराव परुळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
Posted inकोल्हापूर
शेतकरी आंदोलनात दोन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू केंद्र शासनाचे निष्काळजीपणामुळे – निषेधार्थ 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन – शिवाजीराव परुळेकर
