बहुजन जनता दलाचे नरेश गजभिये यांना गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर. पंडितभाऊ दाभाडे
………………………………..
पुणे दि. महाराष्ट्रात लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुक उमेदवारांच्या संदर्भात बहुजन जनता दलाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील बहुजन जनता दलाचे मध्यवर्ती कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली
राज्यात तिसरी राजकीय आघाडी स्थापन करण्यात आली असून या तिसऱ्या राजकीय आघाडीमध्ये राज्यातील 24 राजकीय पक्ष सहभागी असून बहुजन जनता दल राज्यात लोकसभेच्या १० ते १२ जागा तिसरी राजकीय आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले असून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून बहुजन जनता दलाचे कोकण विभागीय अध्यक्ष सुभाष पाटील तर बहुजन जनता दलाचे रत्नागिरी शहराध्यक्ष रामानंद काळे हे इच्छुक असून नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातून बहुजन जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष कैलास देश भरतात आणि बहुजन जनता दलाचे जिल्हा संपर्कप्रमुख अश्विन चांदुरकर हे उमेदवार इच्छुक असून पुणे व शिरूर या मतदार संघातील बहुजन जनता दल पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र बरकडे आणि महिला आघाडी तालुकाध्यक्ष रेशमा पवार ह्या इच्छुक असून गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातून एकमेव उमेदवार नरेश गजभिये बहुजन जनता दलाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष आणि गोंदिया पब्लिक स्कूल लाखांदूर व स्वर्गीय आर पी पुंगलिया नवगाव स्कूलचे मॅनेजर डायरेक्टर तर दैनिक लोकजन पत्रकार हे इच्छुक असून यांच्यासह अनेक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी याकरिता बहुजन जनता दल निवडणूक समिती यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचेही बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी सांगितले
भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून एकमेव इच्छुक उमेदवार व बहुजन जनता दलाचे भंडारा जिल्हा अध्यक्ष नरेश गजभिये यांना भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातून बहुजन जनता दलाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची घोषणा बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केली
यावेळी दिनकर पाटील (उपसरपंच) गणेश मानेकर (उपसरपंच) ग्रामपंचायत सदस्य दिलीप जाधव बाबासाहेब मुळे तेजराव ठाकरे किशोर राऊत प्रवीण भिगांडे निलेश भगत शेखर गायकवाड मंगेश कर्णिक आणि सुभाष पाटील.(प्रदेश उपाध्यक्ष) मंगेश ढोणे (सचिव) अंकुश पवारे(प्रदेश उपाध्यक्ष) दादा माने (कोकण प्रदेश विभागीय अध्यक्ष) (सुभाष तायडे विदर्भ प्रदेश अध्यक्ष) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थितीत होते.
गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातून बहुजन जनता दला कडुन नरेश गजभिये यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भंडारा जिल्ह्यातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तर गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला .
Posted inपुणे
बहुजन जनता दलाचे नरेश गजभिये यांना गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर. पंडितभाऊ दाभाडे
