गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे येथे विदेशी मद्यावर छापा
गडहिंग्लज एक्साईज विभागाची कारवाई
अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. २५ (प्रतिनिधी) लोकसभा २०२४ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविंद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज कार्यालयाने मौजे हडलगे गावच्या हद्दीत, कोवाड-हडलगे रस्त्यावर गडहिंग्लज येथे सापळा रचून गोवा बनावटीची दारु वाहतूक करणारी मारुती सुझुकी कंपनीची सिल्व्हर रंगाची स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहन क्रं. MH-०१-AX-४५५४ जप्त करुन गोवा बनावट दारुचे गोल्डन एस ब्ल्यू फाईन व्हिस्की ब्रॅण्डचे १८० मिलीचे ०६ बॉक्स व ७५० मिलीचे १७ बॉक्स असे एकूण २३ बॉक्स (अंदाजे किंमत रुपये १,३०,८००) असा वाहनासहित एकूण ४,८०,८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक करणारा वाहनचालक नितेश सुरेश कांबळे, व.व. ३० रा. कोवाड ता. चंदगड, जि. कोल्हापूर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाई मध्ये राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज निरीक्षक पी.आर. खरात, दुय्यम निरीक्षक डी.एम.वायदंडे, दुय्यम निरीक्षक एल.एन. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एन. एस. केरकर, जवान बी.ए. सावंत, संदिप जानकर, एस.बी.चौगुले यांनी सहभाग घेतला. या गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज निरीक्षक पी.आर. खरात करत आहेत.