देशातील आगामी सर्व निवडणुका मत पत्रिकेद्वार घ्यावी या मागणी करिता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आजाद मैदानावर धरणे आंदोलन करणार – ज्योतीताई झरेकर

देशातील आगामी सर्व निवडणुका मत पत्रिकेद्वार घ्यावी या मागणी करिता पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आजाद मैदानावर धरणे आंदोलन करणार – ज्योतीताई झरेकर

मुंबई : भारतीय लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी देशातील सर्व निवडणुका EVM मशीन वर न घेता केवळ बॅलेट पेपर वर घ्यावी या प्रमुख मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर ,राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस . आठवले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 1 मार्च 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता आजाद मैदान येथे निदर्शने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माहिती महाराष्ट्र प्रदेश संघटक ज्योती ताई झरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे . आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येणाऱ्या धरणे आंदोलनाची माहिती देशाचे राष्ट्रपती ,महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल , केंद्रीय निवडणूक आयोग ,महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहेया निवेदनावर प्राध्यापक अरुण मेढे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , ज्योती झरेकर प्रदेश संघटक , व मिराताई वहर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी यांच्या सहया आहेत .

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *