

मुंबई : भारतीय लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी देशातील सर्व निवडणुका EVM मशीन वर न घेता केवळ बॅलेट पेपर वर घ्यावी या प्रमुख मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांच्या आदेश नुसार हे धरणे आंदोलन करण्यात आले
आगामी सर्व निवडणुकीमध्ये EVM मशीन वर कायम स्वरूपी बंदी घालुन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी भारताचे राष्ट्रपती , केन्द्रीय निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्यपाल , व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या कडे निवेदना द्वारे केली होती . त्यानुसार आज आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ज्योती झरेकर प्रदेश संघटक , मिराताई वहर प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी , प्रा . अरुण मेढे प्रदेश उपाध्यक्ष , जयसिंग कांबळे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, लक्ष्मीकांत कुंबळे , निखील झरेकर आदी सहभागी झाले होते
दरम्यान महाराष्ट्र राज्य सह मुख्य निवडणुक अधिकारी मनोहर पारकर मंत्रालय मुंबई यांची भेट स्थानिक पोलिस प्रशासनाने आंदोलकाच्या शिष्टमंडळा सोबत घडवून आणले . यावेळी मनोहर पारकर यांनी केन्द्रीय निवडणुक आयोगा कडे आपली मागणी लेखी पत्राद्वारे पाठवले जाईल अशी ग्वाही दिली