डॉ. नाईक द्वारा राष्ट्रीय पल्स पोलियो अभियानाचा शुभारंभ
पॉवर ग्रिड कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पश्चिम क्षेत्र I, क्षेत्रिय मुख्यालय, नागपूर द्वारा आयोजित राष्ट्रीय पल्स पोलियो अभियानाअंतर्गत डागा मेमोरियल स्त्री रुग्णालय, गांधीबाग, नागपूर, महाराष्ट्राच्या रुग्ण कल्याण नियामक व कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी, नागपूर महाराष्ट्राचे प्रतिनिधी तसेच स्वयं ” 88″ वेळा रक्तदान करणारे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. राजेश नाईक यांच्या शुभहस्ते बालकांना पोलियोची मात्रा (Dose) देऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या यशस्वीतेकरिता नागपूर महानगर पालिका, नागपूरच्या शेंडे नगर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्स (Nurse) कुंदा बुरडे तसेच त्यांच्या सहकारी स्वेता लेंडे, सुमित्रा सोमकुवर, पूनम शेंडे, दीपा गजभिए, ज्योती जांभुळकर, मिना लाऊत्रे, अनिता साखरे, ज्योत्सना चिंचाळकर, प्रियंका इंदूरकर, प्रतिक्षा श्यामकुवर, मानिषा डवरे इत्यादी मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले.