पुणे..मोदी सरकारने लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना जाणीवपूर्वक मतांचे राजकारण करत धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठीच CAA हा कायदा लागू केला आहे तो NPR-NRC या कायद्यासी संबंधीत आहे भारतीय नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागनार आहे म्हणून या निर्णयाचा पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी साहेब यांना संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी निवेदन देऊन जाहीर निषेध केला.यावेळी चाँदभाई बलबट्टी,संदिपभाऊ शेंडगे, हासिम खान, जराल्ड डिसोझा आदी मान्यवर उपस्थित होते
भारतीय संविधानाने नागरिकत्वाची जी आचारसंहिता लागू केली आहे या मध्ये व्यक्तीसाठी आहे ती कोणत्याही जातीला किंवा धर्माला नाही. मग भाजपा चे हे सरकार जाणीवपूर्वक मुस्लिम धर्मीय वगळून बाकी सर्व धर्मियांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देणं म्हणजे संविधानाला च लाथाडल्यासारखे आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे तोच उद्ध्वस्त करून मनुस्मुर्ती लादण्याचे षडयंत्र मोदी ,शहा आणि भाजपा सरकार करत आहे. हिंदुराष्ट्र च्या नावाखाली या देशातील मुस्लिम धर्मीय वगळून अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायकारी या कायद्याचा आम्ही निषेध करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे ही विरोध करून हा अन्यायी संविधान विरोधी कायदा मागे घ्यावा असे आवाहन करत आहोत.
जर का जबरदस्तीने हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे.
Posted inपुणे
CAA कायदा संविधान विरोधी केंद्र सरकारचा जाहीर निषेध.. फिरोज मुल्ला(सर )
