स्वातंत्र लढ्यातील
भारतवासीय राष्ट्रवाद
भक्ती हा शब्द श्रद्धेशी निगडित आहे. अध्यात्माच्या श्रद्धा जगात भक्तीला महत्त्व आहे. भक्तीचे वर्तन ही एक स्वतःच्या समाधानाची आणि आध्यात्मिकवाद्यांना हवी असलेली इतरांच्या वर्तनाची गोष्ट असते .भक्ती ही श्रद्धा स्नेह सहभाग एकरूपता आणि मूल्य निष्ठा अशा अनुषंगिक पद्धतीने जीवनात आढळून येते. पण वास्तवात भक्तीचे अध्यात्माशी आणि श्रद्धेशी असलेले नाते न तपासून घेताच आपण भक्ती आचरण करू लागतो. भक्तीमय आचरण ही संस्काराची गोष्ट असून ती सामूहिक वर्तनातून स्वतःहून लीन होऊन स्वीकारली गेलेली गोष्ट असते. भक्तीला परंपरा असते. भक्तीला प्रतीके असतात. भक्तीला भारावलेले वातावरण हे असते अश्या भक्तीची चिकित्सा होत नाही.जो भक्तीभाव आहे. त्यात धन्यताअसते .भक्तीच्या वर्तनात समाधानाचा अंतरीक कृतक असा भाव असतो. तो स्वतःच बाळगलेला असतो. भक्तीचे सांस्कृतिक परंपरांच्या नुसार खोल अनेक अर्थ आढळून येतात .या मार्गावर भक्ताचा भगत होतो भक्ती करणाऱ्यांचा भक्तिधारी वर्ग तयार होतो आणि असंख्य प्रकारचे भक्त तयार होतात .भक्त हे प्रतीकांच्या पूजेसाठी समोर ठेवलेल्या सांप्रदायिक मूर्तीच्या पूजनासाठी आवश्यक असलेला जनसमूह असतो. हा भक्त जनसमूह प्रतीकांची प्रसिद्धी वाढवतो प्रतिकार बद्दल श्रद्धा भाव तो समाजापर्यंत पोहोचवतो तो अनुयायी म्हणून मिरवतो स्वतःस मान्यता संप्रदाय प्रमुखाकडून मिळवीत असतो. तो स्वतास भाविक म्हणतो. तो सेवक म्हणतो .तो वारकरी म्हणतो तो स्वतःला थेट त्या श्रद्धेच्या प्रतिकांचा मध्यस्थ मानून काम ही करतो .मध्यस्तांची भूमिकाच अध्यात्मामध्ये खूप गुंतागुंतीची आहे मध्यस्थ आणि भक्त ही एक श्रद्धेच्या बाजारातील अर्थ(शोषण) साखळी असते . यातूनच भक्त तयार होतात .संप्रदाय मोठा होतो.
भक्त हे भिन्न भक्त पुन्हा वेगळे असतात. या सर्वांच्याहून भक्ती पुन्हा वेगळी त्यांची संप्रदाय भिनंता असते. या सर्व भक्तांच्या वर्तनाचा खूप खोलात जाऊन आपण विचार करायला हवा. स्वतंत्र श्रद्धेने हवी असलेली भक्ती करण्यात गैर काहीच नाही .भक्तीचे श्रद्धा स्वातंत्र्य हे घटनात्मक स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळालेले आहे. .पण भक्तीच्या नशेत आपणअंध भक्त कधी होतो होतो? आपणास अंधभक्त कोण करते ? यातून भक्तांचे रूपांतर देशभक्तातहोते का? हे ही स्वतःहून तपासले पाहिजे .स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्त होते. ते देशभक्त आणि स्वातंत्र्योत्तर काळात तयार करण्यात आलेले देशभक्त त्यांची देशभक्ती या बाबी राष्ट्रवादाच्या उभारणीतील अडसर तर ठरत नाहीत का? इतका मुलगामी विचार करायला हवा.
स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना देशभक्त स्वातंत्र्यसैनिक असेही अभिमानाने संबोधले जात होते. तसा गौरव ही केला जात होता. ही भारावलेल्या राष्ट्रभक्तीच्या वातावरणाची अवस्था नव्वदच्या दशकापर्यंत होती नव्वदच्या दशकानंतर हे वातावरण पूर्णतः बदलले स्वातंत्र्यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या अनेकांना देशभक्त म्हणून घेणे यामध्ये यथार्थतां व सार्थकता वाटत होती
भौगोलिकतेच्या असीमनिष्ठा आणि सार्वभौम जगण्याचे अभिवचन नागरिक राष्ट्रवादाच्या साठी देत राहतात राष्ट्रवादाचा अर्थ त्या भूमिशी त्या राष्ट्रीय संविधानाशी एकनिष्ठ जगण्याचा व्रतनिष्ठ प्रयत्न करण्याचा सर्व नागरिकांचा निरंतर प्रवास म्हणजे राष्ट्रवादी जीवन जगणे होय राष्ट्रवाद ही सामूहिक कल्याणकारी जीवना आकांक्षा आहे ते मानवाचे उद्दिष्ट आहे ते भेदा पलीकडे संविधान मूल्यांच्यासाठी कल्याणकारी जगत राहण्याचा सार्वत्रिक सर्वांचा प्रयत्न असतो. राष्ट्र ही एक प्रतीक बाब आहे ही भौगोलिक आहे हा स्वातंत्र्यातून तयार झालेला मूल्यभाव आहे हा जीवन निष्ठेचा मूर्त जीवन अनुभव आहे म्हणूनच राष्ट्रातील नागरिकांना भारत वाशी निवासी असे म्हटले जाते भारतवासी हे इथे जन्मलेले असंख्य भिन्नतेसह जगत आलेले बांधवाशीय बांधव होय भारतवासीयांचा भारत सर्वांचे भारत हाच राष्ट्रवादीचा पाया असतो सर्वांच्या अथक निष्ठापूर्वक जगण्यातून भारताचा आधुनिक राष्ट्रवादी हा समता बंधुता स्वातंत्र्य प्रस्थापित करतो हे व्यक्ती जीवनातील मूल्य वर्तन हे अजून एक राष्ट्रवादाची उपलब्ध नागरिकांच्या साठी असते नागरिक राष्ट्रवादाला क्वचितच आपल्या चिंतनाचा विषय बनवतात त्यांच्या चिंतनात चर्चेत राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा राष्ट्रीय कर्तव्य यांचे विषय असतात राष्ट्रभक्ती ही पुन्हा या सर्वांच्याहून राजकीय हत्यार म्हणून पुढे आणलेली आहे माझे राष्ट्रभक्ती म्हणजे भारतवासीयांच्या असंख्य नागरिकांच्या जगण्याचा मी द्वेष करणे त्यांच्याशी विषमतेने वागणे त्यांचे जीवन असतील करणे त्यांना सार्वजनिक जीवनातून आर्थिक व्यवहारातून बहिष्कृत करणे त्यांचे मानवी हक्क हिरावून घेणे म्हणजे मी राष्ट्रभक्त अशी जी राष्ट्रभक्तीची नशा नव्याने तयार करण्यात आलेली आहे याचा राष्ट्रभक्त होणाऱ्या झालेल्या वर्गाने विचार करण्याची गरज आहे राष्ट्रभक्ती म्हणजे द्वेष नावे राष्ट्रभक्ती म्हणजे बहिष्कृत इतरांना करणे नव्हे राष्ट्रभक्ती म्हणजे इतरांना दुय्यम नागरिक बनवणे नव्हे राष्ट्रभक्ती म्हणजे भिन्नधर्मीय भिन्नवंशीय बांधवांच्या बद्दल संशय बाळगून त्यांना आरोपी ठरवणे नव्हे त्यांचे जगणे हिरावून घेणे नव्हे राष्ट्रभक्ती म्हणजे एक वंशवाद नव्हे राष्ट्रभक्ती म्हणजे एक धर्म श्रेष्ठ वाद नव्हे राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्ती म्हणजे उन्माद
वर्गाने वंचित दुबळ्या अल्पसंख्यांक जातीचे जीवन उद्ध्वस्त करणे नव्हे राष्ट्रभक्ती ही संविधानाच्या उद्दिष्टासाठी जीवन जगणे होय
संविधान अभिप्रेत राष्ट्रवाद आणि सत्तेवर येणाऱ्या राजकीय पक्षांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद हे पूर्णतः दोन वेगळे आहे एक धर्म एक भाषा हे प्रमाण मानून वाशिक राष्ट्रवाद तयार करण्याचे प्रयत्न हे जगभर चालू आहेत ते नाझीवादाचे विचार स्वीकारल्याचे परिणाम आहेत भारत देशात याच प्रकारचे वर्तन आता सभोवताली आढळून येते आहे ज्या राष्ट्राचा पाया भारतवासी हा आहे हा नाकारून व शवाद हा राष्ट्रवादाचा पाया बनवला जातो तेथे राष्ट्रभक्तांची फौज या असंतोषाच्या कामी वापरली जाते. ती तयार केली जाते. राष्ट्रभक्त हे वंशवादी असतात ते धर्मवादी असतात ते श्रद्धावादी असतात ते इतरांचे मानवी जीवनाचे घटनात्मक प्राप्त हक्क हिरावून घेत आहेत . ते समाज शांती उध्वस्त करतात असा तयार करण्यात आलेला अनेक संप्रदायातील भक्त ही भारतीय राष्ट्रवादाच्या पुढील समस्या आहे यांची नावे आणि काय यांचे वर्तन अनेक प्रकारचे आहे पण उद्दिष्ट मात्र हिंदू इतर नागरिकांना भारतवासी न मानता परके परराष्ट्रीय परप्रांतीय ठरवणे आणि ते या देशातील नाहीत या प्रकारची भेदनीती अमलात आणून त्यांचे सार्वजनिक जीवनातील सर्वाधिकार हिरावून घेणे हे प्रयत्न भारतात पर्वत राज्यांच्या मध्ये उत्तरेकडील राज्यांच्या मध्ये हे चालू झाले आहेत.
अंधभक्त आणि राष्ट्रभक्त हे पुन्हा वेगळे आहेत अंधभक्त अविवेकी हिंसक असतात ते संविधानातील मूल्य ते पायदळी तुडवतात अंधभक्त हे संप्रदायाच्या एक चालका नुवृत्ती आदेशानुसार पुढे सरसावत राहतात . त्यामुळे अनेक राज्यांच्या मध्ये जातीय दंगली घडवून येतात घडवल्या जातात हे पाहावयास मिळते हे सर्व परिणाम अंधभक्तांच्या टोळ्या राष्ट्रीय भक्तीच्या नावाखाली हैदोस घालताना गेल्या काही वर्षात पहावयास मिळत आहेत.
भक्तांचे अंधभक्त रूपांतर करण्यामध्ये वंशवादी धर्मद्वेषी यांना यश आलेले आहे अंध भक्तांच्या टोळ्या राष्ट्रभक्तीच्या नावाखाली समाज दुभांग करण्याचे काम करत आहेत भारतवाशी नागरिकांचे जीवन भीतीचे तयार झाले आहे संपूर्ण जीवनात असुरक्षितता भीती व्यापलेली आहे हे अंधभक्तांनी विभाजित वातावरण तयार केले आहे भारत वाशी यांच्या जीवनाला सतत संशयाने वागवणे त्यांच्या प्रतिघृणा इतरांच्या मनामध्ये निर्माण करणे .
विषमता द्वेष संशय ही भारतीय समाजात चालत आलेली स्वातंत्र्यपूर्व काळापासून ची विकृती आहे सर्वत्र समाज माणूस म्हणून एकमेकाला स्वीकारताना या भावनांचा कमी जास्त दुजाभाव करतो ही इथलीच सनातन विकृती आहे परंपरा आहे मात्र स्वातंत्र्योत्तर काळात 90 च्या दशकानंतर या विकृती मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जीवनात उफाळून येऊ लागल्या आहेत याचे कारणच विभाजित समाज करणे सत्तापादांक्रात करणे आणि निरंतर सत्ता ताब्यात ठेवणे यासाठी भारतवासीयांच्या वाट्याला हा छळवाद आता सातत्याने येतो आहे.
अशा अनेक प्रकारच्या भारतवासीयांच्या छळासाठी हे वंशवादी इतरांना प्रेरित करीत असतात जे हे काम करत नाहीत ते राष्ट्रभक्त नाहीत हे काम करतात ते देशभक्त आहेत असे प्रमाणपत्र वाटप ते राष्ट्रभक्तीच्या नावाखाली ते करत असतात त्यांच्या राष्ट्रभक्तीत भारतवासीयांना वगळून फक्त बहुसंख्यांक एकधर्मीय एक जातीय सनातन वर्तनाचा ऊन मादी धार्मिक समाज तयार करावयाचा असतो त्यासाठी भक्तीची प्रमाणपत्रे ते वाटत राहतात भारत वासी असंख्य जाती धर्म यांना वगळून समाज जीवनातून बहिष्कृत करून ही त्यांचे देशभक्तीचे काम चालू असते त्यांची देशभक्ती हा एक प्रकारचा फोबीया असतो भविष्यातील सांस्कृतिक आक्रमणाची भीती असते धर्म लयाला जाईल अशा वर्तमानाच्या भाकित्यामुळे ते धर्मरक्षण राष्ट्ररक्षण राष्ट्रभक्ती पुण्यभूमीचे रक्षण अशी श्रद्धामय हळी ते सारखी देत असतात .
राष्ट्रवादाच्या आधुनिक जगण्याची संविधानाशी मूल्यनिष्ठेची संलग्न असायला हव्यात वंश आणि धर्म आणि भाषा हे राष्ट्रवादाचे घटक व्यापक राष्ट्रवादीच्या व्याख्येला पुरुष ठरत नाहीत राष्ट्रवाद हा निवासी जैविक प्राप्तीच्या योगातून प्राप्त होत असतो राष्ट्रवाद हा सार्वभौम जीवननिष्ठा जगण्याचा अथक प्रयत्न असतो भेद रहित असतो शोषण रहीत असतो तो सार्वत्रिक मानवी कल्याणाच्या हिताचा प्रयत्न करत असतो राष्ट्र ही एक भौगोलिक श्रद्धा निष्ठा जगण्याच्या निरंतर प्रयत्नात प्रमुख मानलेले असते तिच्याशी एकनिष्ठ राहणे हा भारतवासीयांचाच नव्हे तर जे जे वासिय असतात त्यांच्या वाट्याला हा सर्व भेदा पलीकडचा बहुसंस्कृतिक महत्त्वाचा एकात्म झालेला अस्सल जीवनवाद राष्ट्रवादाची जोडायला हवा एक ग्रंथ एक धर्म एक ईश्वर एक भाषा एक वंश ही राष्ट्रवादाची अपेक्षित रचना ही एक धर्मीय राष्ट्राकडे वांशिक राष्ट्राकडे त्या जनुसमूहाला रूपांतरित करते इथे बहुसंस्कृतिकता नाकारलेले असल्यामुळे स्वाभाविकपणे भेद विषमता शोषण अत्याचार याला वाव मिळतो .भारत आज या वाटेवरून बहु सांस्कृतिकता नाकारून वंशवादी राष्ट्र निर्मितीकडे चालला आहे असे हे अंधभक्तांचे भक्ती अंतरिक वर्तन ही देशाची मोठी समस्या आहे भारतवासीयांच्या सहभागी सह अस्तित्व सहजीवन या राष्ट्रवादीच्या आकांक्षाला इथे छेद दिला जातो आहे हे होऊ द्यायचे नसेल तर भारत वासियाच्या . बहु संस्कृतिक महत्तेचा संविधाननिष्ट मानवतावाद सतत प्रस्थापित करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे अंध भक्तांच्या टोळ्या रोखल्या पाहिजेत देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटप कार्यक्रमात आपसूकपणे सहभागी होता कामा नये हे झाले तरच सजग राष्ट्रवाद हा द्वेष न वाढवता शांती सद्भावाचा राष्ट्रवाद प्रस्थापित करण्यासाठी हेतूपूर्वक प्रयत्न करता येतात हे प्रत्येक भाषिक जातीय धार्मिक बांधवांनी स्वयंवर्तनातून दाखवून देण्याची गरज आहे इथल्या प्रभुत्व फाशीवादी फौजेला अर्थातच अंध भक्तांच्या डोळ्यांना रोखण्यासाठी निर्भयता सुसंवाद सत्याग्रह आत्मक्वेष याशिवाय वर्त मानात मार्ग दिसत नाही.
जैविक अपघाताच्या धर्म वंश भाषा या प्राप्तीला हिंसेकडे नेणारे हे कोण कोण आहेत हे सतत आता समजून सांगावे लागेल मांडावे लागेल त्यांच्या अंधभक्तीच्या टो ळ्यांचे कार्यक्रम निर्भयतेने रोखावे लागतील त्यासाठी भारतवासी यांची हाळी द्यावी लागेल ही आधुनिक राष्ट्रवादीची ही अस्तित्व आबादीत ठेवणारी
हाळी ऐकावी लागेल एकात्म भारताच्या संविधानांतर्गत मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी राईट टू फूड राईट टू एज्युकेशन राईट टू स्पीच राईटटू लँड राईट टू फेथ राईट टू डिसेंट राईट टू शेल्टर राईट टू मेडिसिन राईट टू लिव्ह राईट टू एक्सप्रेशन या मानव मुक्तीच्या अनेक प्रकारच्या लढाया अथक ताकतीने निर्भयतेने लढाव्या लागतील जगभर चे व निवासी यांच्यासाठी हे शुद्धता वाद्यांनी वंशवाद्यांनी तयार केलेले हे वंशिक राष्ट्रवादाचे संकट ही जगभरची समस्या आहे हे अवैज्ञानिक आहे हे निरर्थक आहे मात्र या संघर्षातून निर्माण होणारा असंतोष आणि विध्वंस हा होऊ द्यायचा नसेल तर भारत निवासी राष्ट्रवादाच्या
नव्या मांडणीकडे सांस्कृतिकतेची सर्व चिकित्सा दूर ठेवून पुढे जावे लागेल मानव्य हा पाया सर्व भेद रहितता व शोषणमुक्त समाज जीवन त्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा सार्वत्रिक अंमल ही पायाभूत तत्वे भारतवासीय जीवनात सर्वांकष अमलात आणण्याची गरज आहे यातूनच भारतवासीय हा नव राष्ट्रवादी तयार होऊ शकतो.
शिवाजी राऊत
सातारा
4 ऑक्टोंबर 24 वेळ स 6.41