बुद्ध पौर्णिमा जयंती महोत्सव सर्वधर्मीय समिती तर्फे उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर, दि. ११ (प्रतिनिधी) शिवाजी पेठेतील प्रसाद तरुण मंडळ सभागृहात सर्वधर्मीय समितीतर्फे बुद्ध पौर्णिमा जयंती महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असुन,विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.
कार्यक्रमाचे आयोजक अमोल कुरणे यांनी बुध्दमूर्तीस पुष्प अर्पण केले. सर्व उपस्थितांन कडून त्रिशरण, पंचशील, धम्मपालन गाथा ग्रहण करण्यात आली.
याप्रसंगी प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या अध्यापिका प्रा. स्मिता चौगुले यांनी सर्वांना धम्मउपदेशना दिली.
यावेळी रवींद्र कुरणे,आयोजक अमोल कुरणे, पॅंथर आर्मीचे संस्थापक संतोष आठवले, पंडितराव चौगुले, निवासराव सूर्यवंशी, सर्वधर्मीय जयंती समितीचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी, प्रशांत अवघडे, संचिता ठोंबरे, मनीषा घुणकीकर, सुवर्णा कुरणे, मनीषा ठोंबरे, प्रियंका कुरणे, समीक्षा ठोंबरे, पूजा कुरणे आदी उपस्थित होते.