
पुणे : येथील आघाडीची वृत्त संस्था प्रेस मीडिया लाईव्ह मध्ये पुण्यातील लेखक डॉ. तुषार निकाळजे यांनी वराती मागून घोडे” हा मराठी भाषेतील लेख प्रकाशित केला. सदर लेख डेलीहंट या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आला. हा लेख डेलीहंट डिजिटल मीडिया या समाज माध्यम असलेल्या ऍप वर अपलोड केल्यानंतर अवघ्या ९० मिनिटांमध्ये ३६६०२ व्हूवर्सची नोंद झालेली आहे. सदर विक्रमाची नोंद क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे
क्रेडेन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी, “ही उल्लेखनीय आकडेवारी प्रभावी प्रादेशिक पत्रकारितेचे सामर्थ्य दर्शवते, तसेच डॉ. निकाळजे यांच्या लेखक म्हणून असलेल्या प्रभावाची साक्ष देते. त्यांच्या या यशामुळे डिजिटल युगात मराठी साहित्यात एक अभिमानास्पद ठसा उमटला आहे”.असे म्हटले आहे.
सदर लेखामध्ये डॉ. निकाळजे यांनी व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक विषय हाताळला आहे. याप्रसंगी प्रेस मीडिया लाईव्ह या डिजिटल समाज माध्यमाचे मुख्य संपादक श्री. मेहबूब सर्जेखान म्हणाले, ” सध्याच्या तांत्रिक युगामध्ये प्रत्यक्ष व्यक्तींचा संवाद कमी झालेला आहे, असे म्हटले जाते. परंतु लिखाणा द्वारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेल्या भावनांचा विचार करणे आवश्यक आहे. यामुळे व्यक्ती, कुटुंब, समाज यांचे नाते घट्ट राहते”.
डिजिटल मीडियामध्ये क्रांती घडवणारे प्रेस मीडिया लाईव्ह वर सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होऊ लागला आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे