पँथर आर्मी तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे कोल्हापुर शाहू स्मारक येथे आयोजन
कोल्हापुर : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना कोल्हापुर जिल्ह्याच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन , व्याख्यान व अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी दिली आहे .
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 00 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापुर येथे .साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन , डॉ . शरद गायकवाड यांचे व्याख्यान व अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
मुक्त पत्रकार सिद्धार्थ तायडे (बुलढाणा ) ,साप्ताहिक झुंझार लेखणी संपादक संतोष धुरंधर ,दैनिक वृत्तरत्न सम्राटचे पत्रकार दत्ताजी सुर्यवंशी व ज्येष्ट साहित्यिक भगवान धेंडे ( पुणे ) , हिंदरत्न डॉ दिपक लोंढे (सांगली ) शेषराव कर किलीकर (लातूर )यांच्या सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक व पत्रकांराना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेले ज्येष्ट पत्रकार दगडू माने व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते राजेंद्र घाटगे यांचा विशेष नागरी सत्कार सोहळ्याचे ही आयोजन करण्यात आले आहे .
या क्रार्यक्रमास सामाजिक विचारवंत प्रा डॉ शरद गायकवाड , जेष्ट पत्रकार डॉ दगडू माने , राजू घाटगे , शेतमजुरांचे नेते सुरेश सासने , मोहन मालवणकर , राजेंद्र मोहीते , पत्रकार योगेश पांडव ॲड ममतेश आवळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .