लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा’ मध्ये मातंग समाजाचा ‘संविधान बचाव’ कृतिशील सहभाग!

लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा’ मध्ये मातंग समाजाचा ‘संविधान बचाव’ कृतिशील सहभाग!


✊ ‘लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा’ मध्ये मातंग समाजाचा ‘संविधान बचाव’ कृतिशील सहभाग!
कोल्हापूर (प्रतिनिधी):
सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर रोजी ‘लोकशाही व संविधान सन्मान महामोर्चा’ हा आंबेडकरी समाज, पक्ष आणि संघटनांच्या वतीने कोल्हापूर शहरात प्रचंड ताकदीने आणि अभूतपूर्व उत्साहात यशस्वी झाला. लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि संविधानाच्या रक्षणाच्या मुख्य मागणीसाठी हा महामोर्चा अवघ्या दहा दिवसांच्या तयारीमध्ये भव्य स्वरूप धारण करून रस्त्यावर उतरला. या मोर्चात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असला तरी, मातंग समाजाचा सहभाग, त्यांची तळमळ आणि कृतिशीलता विशेषतः उल्लेखनीय ठरली.
मोर्चाला ताकद देण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी मातंग समाजाच्या अनेक विचारवंत, नेते आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत कमी वेळेत निर्णायक जबाबदाऱ्या पार पाडल्या.
🌟 मातंग समाजाच्या प्रमुख शिलेदारांचे कृतिशील योगदान:

  • अॅड. दत्ताजीराव कवाळे यांची मोलाची भूमिका: सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा मातंग समाजातील विचारवंत अॅड. दत्ताजीराव कवाळे यांनी एका रात्रीत यंत्रणा राबवून कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील साहेब यांना थेट बिंदू चौकात आणले. पाटील साहेबांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महामोर्चाची सुरुवात झाली. कवाळे सरांच्या या तळमळीच्या प्रयत्नामुळे मोर्चाला अधिकृत व वैचारिक बळ मिळाले.
  • बंडखोर सेनेची दमदार घोषणाबाजी: बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक शिवाजीराव आवळे (अण्णा) हे पहिल्या बैठकीपासून नियोजनात सहभागी होते. मोर्चाच्या दिवशी त्यांनी सुरेश आवळे (भैय्या), अभिषेक भंडारे, आलेश नांगरे, भालचंद्र दबडे, राहुल देडे यांच्यासह लक्षवेधी घोषणांनी दमदार खिंड लढवली. तसेच त्यांच्या ‘बंडखोर न्यूज’मधून सातत्याने मोर्चाचा प्रचार-प्रसार करून कृतिशील सहभाग नोंदवला.
  • प्रशांत चांदणे यांचा वैचारिक आधार: आंबेडकरी चळवळीतील ‘थिंक टँक’ व अभ्यासू व्यक्तिमत्व प्रशांतजी चांदणे यांनी आपल्या चिकित्सक लेखणीतून सोशल मीडियावर महामोर्चाचे महत्त्व आणि तो का आवश्यक आहे, हे प्रभावीपणे मांडले. सुरुवातीपासून उपस्थित राहून त्यांनी वैचारिक आणि सक्रिय सहभाग दिला.
  • इचलकरंजीहून सक्रिय पाठिंबा: इचलकरंजी येथील मातंग समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक मा. अब्राहम आवळे (बापू) यांनी मोर्चासाठी झेंडे आणि स्कार्फ पाठवून महत्त्वाची मदत केली.
  • अन्य मान्यवर आणि संघटनांचा सक्रिय सहभाग: आळते गावातील मार्गदर्शक अशोक आळतेकर सर व बाबासो यशवंत, निवृत्त मुख्याध्यापक गोपाळजी साठे सर, अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे, ज्येष्ठ नेते लालासाहेब नाईक, बहुजन परिवर्तन पार्टीचे अध्यक्ष बाजीराव नाईक, आजारी असूनही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे इचलकरंजी शहर अध्यक्ष बादल हेगडे, डी. पी. आय.चे नेते राजाराम सुवासे, दादासाहेब माने, क्रांतीगुरु लहुजी साळवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवी, शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे माजी अध्यक्ष शशिकांत घाडगे, पप्पू सावंत, माई सावंत, दलित महासंघाचे बाळासाहेब साळवी आणि आम आदमी पार्टीचे विजय हेगडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
    रुपाताई वायदंडे (अध्यक्षा – प. महा. रिपाइं (ए)) यांनी या सर्व मान्यवरांशी सतत संपर्क साधून मोर्चानिमित्त चर्चा केली. त्यांनी सर्व मातंग बंधू-भगिनींचे ‘संविधान बचाव’ अभियानातील या कृतिशील प्रयत्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
    हा महामोर्चा केवळ आंबेडकरी पक्षांचे शक्तीप्रदर्शन नव्हते, तर लोकशाही आणि संविधानावर निष्ठा ठेवणाऱ्या मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या वैचारिक व संघटनात्मक ताकदीचे ते प्रभावी दर्शन होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *